शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

पवारांच्या ‘पॉवर’ने राष्ट्रवादी ‘वॉशआऊट’

By admin | Updated: October 23, 2014 00:16 IST

राजेश खराडे , बीड विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सहा ही मतदार संघात धक्कादायक निकाल लागले आहेत. गेवराई मतदार संघात रा.कॉं. चे बदामराव पंडीत व भाजपाचे नवनिर्वाचित उमेदवार

राजेश खराडे , बीडविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सहा ही मतदार संघात धक्कादायक निकाल लागले आहेत. गेवराई मतदार संघात रा.कॉं. चे बदामराव पंडीत व भाजपाचे नवनिर्वाचित उमेदवार लक्ष्मण पवार असल्याने संबंध जिल्ह्याचे लक्ष या मतदार संघाकडे लागले होते. पक्षाच्या साथीने व पवारांच्या पॉवर ने गेल्या पंधरा वर्षापासून सत्तारुढ असलेला राष्ट्रवादी पक्षाचे मतदार संघातून वॉश आऊट केले आहे.गेवराई या स्थानिक शहरातून पवार यांना तर मताधिक्य आहेत तर संबंध मतदार संघातील प्रत्येक गटातून तर गटातल्या जवळपास सर्व गावातूनही पवार यांना मतदारांनी पसंती दिली असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. भाजपा व राष्ट्रवादी पक्ष सोडता इतर पक्षातील उमेदवारांना व अपक्षांना चार आकडीही मते मिळवता आलेली नसल्याचे दिसते. मततदासंघात प्रमुख पक्षांसह तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गेवराई शहरातून लक्ष्मण पवार यांना सर्वाधिक ८७१० मते मिळाली आहेत तर त्यापाठोपाठ रा.काँ. चे बदामराव पंडित यांना ६०५३ मतांवरच समाधान मानावे लागले आहे. कॉग्रेसचे सुरेश हात्ते यांना ३६४, मनसे चे राजेंद्र मोटे यांना १०७, बसपा चे उघडे दिलीप यांना ९८ तर कम्युनिस्ट पक्षाचे भाऊराव प्रभाळे यांना शहरातून केवळ ८० मते मिळाली आहेत. शहरातून पवार यांना ४० टक्के मतदान झाले आहे तर रा़ कॉं. बदामराव पंडीत यांना २८ टक्के मतदान मिळाले आहे. मतदार संघात रा.कॉ. झिडकारून परिवर्तन घडून आणले आहे.मादळमोही गटातही पवार प्लसमध्येच गेवराई मतदार संघातील प्रत्येक गटातून भाजपाचे लक्ष्मण पवार यांनी आघाडी घेतलेली आहे. मादळमोही गटातीलही जवळपास सर्वच गावातून त्यांना मताधिक्य मिळाले आहे. मादळमोही गटातून यंदाच्या निवडणुकीत मताचा टक्का वाढला आहे. या वाढीव टक्क्यातील मतदारांनी भाजपाचे लक्ष्मण पवार यांना कौल दिला असल्याचे दिसत आहे. मादळमोही गटातून भाजपाला ९९२१ तर राष्ट्रवादीचे बदामराव पंडित यांना ६२२५ मते आजमाविता आलेली आहेत तर कॉग्रेसचे सुरेश हत्ते यांना ३४० व शिवसेनेचे अजय दाभाडे यांना केवळ ३५४ मते मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे सबंध गटातून भाजपाचे लक्ष्मण पवार यांना मताधिक्य मिळाले असल्याचे दिसते.