शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

पाटील, मोटे आज उमेदवारी दाखल करणार

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणाजगजितसिंह पाटील व राहुल मोटे हे २५ सप्टेंबर रोजी तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणाजगजितसिंह पाटील व राहुल मोटे हे २५ सप्टेंबर रोजी तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही पक्षाकडून मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातून राकँतर्फे माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील हे गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धारासूर मर्दिनी, ख्वॉजा शमशोद्दीन गाझी रहे. दर्गाह येथे दर्शन घेवून लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येईल, असे राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी कळविले आहे. तसचे भूम-परंडा-वाशी या मतदार संघातून राकाँच्या वतीने विद्यमान आ. राहुल मोटेही गुरूवारीच उमेदवारी दाखल करणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर गौलाई चौकातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा ओंकार चौक, नगर परिषद चौक, वेताळ रोड मार्गे आण्णा भाऊ साठे गोलाई चौकातून साहील दूधसंकलन केंद्र येथे दाखल होईल. त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.दरम्यान, तुळजापूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे शुक्रवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमित देशमुख, बसवराज पाटील यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळीच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर हडको मैदानावर जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील व माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी कळविले आहेत. (प्रतिनिधी)