जालना : शहरातील बहुचर्चित १२७ कोटी रूपये खर्चाची अंतर्गत जलवाहिनी आणण्याचे श्रेय हे नगर पालिकेचे असल्याचा दावा माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.राज्य शासनाने शहरासाठी अंतर्गत जलवाहिनी अंथरण्यासाठी मंजुरी दिली होती. सध्या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या हिशाचे २३ कोटी २ लाख ६१६ रूपये भरायचे आहेत. त्यापैकी १ कोटी रूपये जीवन प्राधिकरणाकडे भरण्यात आल्याचे गोरंट्याल म्हणाले. उर्वरित रक्कम पंधराव्या वित्त आयोगामधून मिळणाऱ्या रकमेतून परस्पर काढून घेण्यात येणार आहे. राज्य शासनाकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे या योजनेला २०१४ मध्ये मंजुरी देण्यात आहे. तसे जीवन प्राधिकरणाचे अधिकृृत पत्र आमच्याकडे आहे. या योजनेचे ज्यांनी काही कामच केले नाही अशांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर त्यांनी निशाना साधला. आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच शहरासाठी ही योजना मंजूर झाली आहे. याचे श्रेय लाटणाऱ्यांना याची कल्पना सुध्दा आहे. ते शहरावासीयांना सुध्दा माहीत आहे. दिशाभूल करणाऱ्यांनी श्रेय लाटण्यापेक्षा विकासाचे राजकारण करण्याचा सल्ला गोरंट्याल यांनी दिला.जायकवाडी जालना जलवाहिनी पूर्ण केल्यानंतर शहरासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी मिनरल वॉटर प्रकल्प मंजूर करण्यासाठी आपला प्रयत्न होता. परंतु शहरातील अंतर्गत जलवाहिनी ही निजामकालीन असल्याने ती जागोजागी फुटलेली आहे. त्यामुळे शहरावसियांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. त्यासाठी २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना स्वर्णजयंती नगोरात्थान योजनेतून शहरासाठी अंतर्गत जलवाहिनी मंजूर करून घेतली. यासाठी तात्कालीन पाणी पुरवठा मंत्री ते जीवन प्राधिकरण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करावा लागला. त्याचे सर्व दस्ताऐवज आपल्याकडे उपलब्ध आहेत. याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर ते केवळ नगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला.सरकार बदलानंतरही पाठपुरावाराज्यात आणि केंद्रात भाजपा सेनेचे सरकार प्रस्थापित झाले. परंतु सरकारने या योजनेचा जाणीवपूर्वक नगरोत्थान योजनेतून अटल अमृत योजनेत समावेश केला. अटल योजनेत नगरपालिकेला ५० टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. त्याच नगरोत्थान योजनेत फक्त पालिकेने २५ टक्केच हिश्यावर योजनेला मंजुरी मिळवून आणली होती. सध्या सरकार सेना भाजपाचे असल्याने ही योजना मार्गी लावण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन शहराच्या चांगल्या योजनेसाठी सहकार्य करण्यासाठी विनंती केली. दानवे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना या योजनेला नगरोत्थान योजनेतच ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. फडणवीस यांनी पुन्हा या योजनेला नगरोत्थानमध्ये समाविष्ट केल्याचे गोरंट्याल म्हणाले.
अंतर्गत जलवाहिनी योजनेचे श्रेय आमचेच
By admin | Updated: March 30, 2016 00:35 IST