शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

भंडारवाडीच्या पाण्याची नुसतीच आस

By admin | Updated: December 16, 2014 01:06 IST

आशपाक पठाण, लातूर गेल्या दोन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ मांजरा प्रकल्पात पाणी अत्यल्प असल्याने मनपा प्रशासनाने नवा पर्याय समोर आणला़

आशपाक पठाण, लातूरगेल्या दोन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ मांजरा प्रकल्पात पाणी अत्यल्प असल्याने मनपा प्रशासनाने नवा पर्याय समोर आणला़ रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकून, नवे पंप बसविण्यासाठी मनपाने तीन महिन्यांत पाचवेळा कंत्राट काढले़ जवळपास ३० कोटींचे काम असतानाही कंत्राटदारांनी या कामाकडे पाठ फिरविली आहे़ लातूरकर मात्र गेल्या वर्षभरापासून भंडारवाडीच्या पाण्याकडे आस लावून बसले आहेत़ कंत्राटदारच मिळत नसल्याने प्रशासन पेचात पडले आहे़मांजरा प्रकल्पातून मिळणारे पाणी अपुरे पडत आहे़ गेल्या काही वर्षांपासून मांजरा प्रकल्प भरला नसल्याने लातूरकरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत़ अगदी पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली़ यावर्षी टंचाईत मांजरा नदीवरील बॅरेजेसने काही प्रमाणात तहान भागविण्याचे काम केल्याने बॅरेजेसचा चांगलाच आधार झाला आहे़ मात्र, पर्यायी व्यवस्था असावी म्हणून मनपा प्रशासनाने नव्या ठिकाणच्या पाण्याचा शोध सुरू केला आहे़ लिंबोटी प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना शक्य नसल्याने पुन्हा उजनीचा पर्याय समोर आला़ शहरापासून जवळ असलेल्या भंडारवाडी प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी मनपा प्रशासनाने निधीही आणला आहे़ शासनाने भंडारवाडी प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी जवळपास ३० कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर केला आहे़ निधी मंजूर झाल्यावर मनपाने पाचवेळा भंडारवाडी पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी निविदा मागविल्या़ प्रारंभी निविदा काढल्यावर केवळ एक निविदा आल्याने ती उघडण्यात आली नाही़ पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात आल्या़ त्यावेळीही प्रतिसाद मिळाला नसल्याने मुदतवाढ देण्यात आली़ ३० कोटी रूपयांच्या कामाला कंत्राटदार मिळत नसल्याने मनपा प्रशासनही पेचात पडले आहे़ नेमकी चूक काय आहे? याचे संशोधन करण्यात अधिकारी व कर्मचारी मग्न झाले आहे़ आता पाचव्यांदा याच कामाचे टेंडर काढण्यात आले आहे़ लातूरकर मात्र पाण्याकडे अपेक्षा लावून आहेत.४भंडारवाडी प्रकल्प ते वरवंटी हे जवळपास २२ किमीचे अंतर आहे़ २२ किलोमीटरची जलवाहिनी टाकून प्रकल्पस्थळी पंप हाऊसचे बांधकाम तयार करण्यासाठी २५ कोटी रूपयांचे आता नव्याने टेंडर काढण्यात आले आहे़ ४रोड क्रॉसिंग, विद्युत अन्य बाबींवर खर्च करण्यासाठी त्या त्या वेळी तरतूद करण्यात येणार आहे़ शिवाय, वरवंटी येथे असलेल्या जुन्या जलशुध्दीकरण यंत्राच्या दुरूस्तीसाठीही राखीव निधी ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली़ ४भंडारवाडी प्रकल्पातील पाण्याची लातूरकरांना नुसतीच आस लागली आहे़ जोपर्यंत जलवाहिनीचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत पाणी मिळणे अशक्य आहे़ जलवाहिनी टाकण्यासाठी खरेदी करावयाच्या पाईपची किंमत अधिक असून टेंडरमध्ये अत्यंत कमी धरण्यात आली आहे़ ४महाग असलेले पाईप खरेदी करण्यासाठी ८० टक्के रक्कम संबंधित कंपनीला रोख द्यावी, लागणार आहे़ प्रांरभी गुंतवणूक मोठी असल्याने कंत्राटदार धजत नसल्याची चर्चा आहे़ कंत्राटदार मिळत नसल्याने काम रखडले असताना अजून किती दिवस मनपा कंत्राटदाराच्या शोधात राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़