शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सेवा बनली अडथळ्यांची!

By admin | Updated: January 11, 2017 00:14 IST

जालना संपूर्ण जिल्हा कॅशलेस करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.

राजेश भिसे जालनासंपूर्ण जिल्हा कॅशलेस करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी खते, बियाणे, कीटकनाशक इ. खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेले आॅनलाईन व्यवहार म्हणजे अडथळ्यांची शर्यत ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बँकांकडून सेवा मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार असून, त्यांच्यात नाराजीचा सूर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहारासाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून गतवर्षी ८ नोव्हेंबर रोजी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर कमी पैसा चलनात रहावा, यासाठी कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हा प्रशासनाने या दृष्टीने हालचाली सुरु केलेल्या आहेत. जिल्ह्यासाठी जवळपास दीड हजार ‘पॉस’ (पॉइंट आॅफ सेलिंग) मशिन्सची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. टप्प्याने या मशिन्स उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी सांगितले. सुरुवातीला स्वस्त धान्य दुकानदारांसाठी ‘पॉस’ यंत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर व्यावसायिक आणि इतर प्रतिष्ठानांना देण्यात येतील. त्याचप्रमाणे खते, बियाणे आणि कीटकनाशक व इतर शेती साहित्य खरेदीसाठी आॅनलाईन व्यवहार सक्तीचा करण्यात आला आहे. बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये इंटरसेवा, बँकांचा शाखा, कर्मचारी संख्या आदी समस्यांमुळे शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जोंधळे यांनी बँकांचे अधिकारी आणि खते विक्री करणारे डीलर्स यांची संयुक्त बैठक घेऊन कॅशलेस व्यवहारासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. याला सध्या तरी काही अंशीच यश येत असल्याचे दिसून येत आहे. एक महिन्यानंतरही बँकांतील समस्या दूर झालेल्या नाहीत. एनईएफटी वा आरटीजीएस करताना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी तर वैयक्तिक संबंधांवरच खते, औषधी वा इतर साहित्य शेतकऱ्यांना डीलर्स देत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना कृषीसाहित्य खरेदीसाठी कॅशलेस व्यवहार करताना अनंत अडचणी येत आहेत. यासाठी बँकांनी यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.