शहरं
Join us  
Trending Stories
1
सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पीएम मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले, सैनिकांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; १० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता 
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

वयोवृद्ध मूर्तीकार मदतीपासून उपेक्षितच

By admin | Updated: March 13, 2015 00:38 IST

गजानन वानखडे , जालना सलग ५० वर्षांत आपल्या हातांनी विविध कलाकृतींची, देवदेवतांची मूर्ती तयार करून लोकांची दाद मिळविणारे कठोरा जैनपूर (ता. भोकरदन) येथील ८० वर्षीय

गजानन वानखडे , जालनासलग ५० वर्षांत आपल्या हातांनी विविध कलाकृतींची, देवदेवतांची मूर्ती तयार करून लोकांची दाद मिळविणारे कठोरा जैनपूर (ता. भोकरदन) येथील ८० वर्षीय वयोवृद्ध मूर्तीकार सुखलाल तानाजी नरवणे हे मात्र शासनाकडून वयोवृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनापासून वंचित आहेत. सुखलाल यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपल्या विविध चित्रांनी लोकांशी प्रशंसा मिळविली. बेलदार समाजाचे असल्याने सुखलाल यांचे ज्येष्ठ बंधू सखाराम यांच्यासोबत गावोगावी जाऊन नागरिकांच्या घराचे बांधकाम करून देणे, खांबावर विविध कलाकृती, देवीदेवतांच्या मूर्ती तयार करण्याचे काम ते करत. दगडावर छन्नी हतोड्याने मूर्ती घडविण्याचे काम ते यातूनच शिकले. कोरीव कामातून त्यांनी अनेकविध मूर्ती साकारल्या आहेत.याबाबत सुखलाल नरवणे म्हणाले की, १९६५ साली भोकरदन तालुक्यातील चिंचोली येथे पहिल्यांदा दगडावर कोरीव काम करून महादेवाची पिंड मी तयार केली. खऱ्या अर्थाने येथूनच माझ्या कामाची सुरूवात झाली.भोकरदन, परतूर, मंठा, बदनापूर आदी तालुक्यांतील जुन्या मंदिरांचे काम असो, अथवा जुन्या घरांचे दगडी बांधकाम, आपण अशी बरीच कामे केलेली आहेत.बहुतांश मंदिरातील नंदी, गायमुख, खांबावरील विविध कोरीव काम, गावातील शनी महाराजांची गरूडावर बसलेली मूर्ती, चांदई ठोंबरी येथील नंदी, गोसेगाव भैरवाचे मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिराचे कोरीव काम, परतूर तालुक्यातील नांगरतास मंदिराचे कोरीव काम, राजगुरू महाराजांची समाधी मंदिर, कोकरसा देवी मंदिर आदी मंदिरांच्या मूर्तीचे कोरीव कामे मी केली आहेत, असे त्यांनी सांगितले़ नरसिंह, मत्स्य, कच्छ, वराह, कुरमह, राम, परशुराम, हनुमान आदी दहा देवतांच्या मूर्ती देखील साकारल्या आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह याच कलेच्या आधारावर असल्याने सुखलाल हे प्रत्येकवेळी कलेल्या मोबदल्यात पैसे घेण्याऐवजी मिळेल ते अन्नधान्यही घेत होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी एका मूर्तीचे काम करत असताना सुखलाल यांना अर्धांगवायूचा झटका आला. यात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले आहेत. त्यामुळे वयाच्या ८० व्या वर्षी मूर्ती घडविण्याची इच्छा असली तरी ती घडविणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.अशा प्रकारची कला त्यांच्या अंगी असून देखील हा कलावंत शासनाच्या मदतीपासून आदयापर्यंतही वंचितच आहे, ही अत्यंत खेदजनक आहे़