जालना : जालना नगर पालिकेने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान २०१३-१४ अंतर्गत केलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या एका विशेष समितीने गुरुवारी दुपारी पालिका कार्यालयात जाऊन घेतली. यावेळी पालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समितीला गोलमोल उत्तरे देऊन बुचकळ्यात पाडले. जिल्हास्तरीय समितीने दुपारी चार वाजता पालिकेत एक विशेष बैठक घेऊन विविध विभागातील कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एएसआर रंगानायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता अजय सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, नगराध्यक्षा पावर्ताबाई, उपनगराध्यक्ष शाहआलम खान, नगर रचनाकार सु.आ.पवार, मुख्याधिकारी दीपक पुजारी उपमुख्याधिकारी के.के. मुखेडकर, गटनेते राहुल हिवराळे आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी नगर पालिकेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.२०१३-१४ मध्ये करण्यात आल्याचा कामांची माहिती देण्यासाठी पालिकेने एक गोषवारा तयार केला होता. या आधारावरच अधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांची चांगलीच फिरकी घेत गोषवाऱ्यात आणि प्रत्यक्षात सांगण्यात किती त्रुटी दाखवून पालिकेचे पितळ उघडे पाडले. सुरुवातच पाणीपुरवठा विभागापासून झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अजयसिंग यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.जालना शहरासह जायकवाडीतून २० तर घाणेवाडी जलाशयातून ५ एमलडी पाणी येत असल्याचे विभागप्रमुखांनी सांगितले. लोकसंख्येच्या तुलनेत इतके पाणी लागते पुरते का, सार्वजनिक वितरण प्रणाली कशी आहे, नळ जोडण्या किती, अधिकृत किती, अनधिकृत किती याबाबत चांगलाच खल झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता अजय सिंग यांनी पाणीपुरवठा विभागासाठी आमच्या विभागाची काही मदत लागल्यास ती देण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले. वॉटर आॅडिट, फ्लोमीटर, दूषित पाणीपुरवठ्याबाबत सिंग यांनी सूचना दिल्या. उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांनीही यावेळी सूचना केल्या. जिल्हाधिकारी रंगानायक यांनी पालिकेचे जिल्हा परिषदेकडे काय प्रलंबित प्रश्न आहेत यावर विचारणा करुन ते तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना केल्या.यात प्रामुख्याने दरेगाव ग्रामपंचात हद्द तसेच शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी पाणीपुरवठा व्यवस्थापन, स्वच्छालय व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य,नागरी सुविधा, शहर रचना व्यवस्था व सौंदर्यीकरण, मनुष्यबळ व्यवस्थापन, सर्वसाधारण आर्थिक व्यवस्थापन, कुटुंब कल्याण, घनकचरा व्यवस्थापना चर्चा करण्यात आली. दरम्यान पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी रंगानायक यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.बैठकीस डी.टी.पाटील, हरिश्चंद्र आंधळे, देशमुख, कदीर, कुरलिये, साळवे, सुरेश शर्मा, संतोष अग्निहोत्री, संदीप वानखेडे, विजय फुलंब्रीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसली तरी यावर कोट्यवधींचा खर्च झाल्याचे गोषवाऱ्यात अनावधानाने नमूद करण्यात आले. दरम्यान बारा कोटींचा खर्च संपूर्ण स्वच्छतेवर खर्च झाल्याचे अभियंता सऊद यांनी स्पष्ट केले. विविध विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. त्यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा तपशील अधिकाऱ्यांसमोर मांडला.शहरातील ५५ हजार कुटुंबांना पाणी देताना नगर पालिकेस मोठी कसरत करावी लागते. पालिका पाणीपट्टी पोटी वर्षाला २७०० रुपये खर्च करीत असली तरी ही रक्कम वाढवावी, अशी सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. दरम्यान, मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी विविध विभागांची माहिती देऊन राबविण्यात आलेल्या योजना सांगितल्या. दरम्यान, नळपट्टी काही दिवसांपूर्वीच वाढविल्याचे पुजारी यांनी निदर्शनास आणून दिले.
अधिकाऱ्यांची झाडाझडती !
By admin | Updated: July 24, 2015 00:44 IST