शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

अधिकारी ‘मस्त’ अन् खेळाडू ‘त्रस्त’!

By admin | Updated: March 13, 2015 00:41 IST

महेश पाळणे , लातूर कुठलाही खेळ म्हटले की, मैदान आलेच़ खेळाडूही मैदानाला आपले मंदिर समजतात़ मात्र क्रीडा संकुलातील या खेळाडुंचा देवच गाभाऱ्यातून निघून गेला आहे़

महेश पाळणे , लातूरकुठलाही खेळ म्हटले की, मैदान आलेच़ खेळाडूही मैदानाला आपले मंदिर समजतात़ मात्र क्रीडा संकुलातील या खेळाडुंचा देवच गाभाऱ्यातून निघून गेला आहे़ त्याचे मुख्य कारण म्हणजे मैदानाची झालेली दुर्दशा़ यामुळे कबड्डी, खो-खोसह व्हॉलीबॉलपटुंना निकृष्ट मैदानावर आपला दैनंदिन सराव करावा लागत आहे़ प्रशासनाच्या टोलवाटोलवीत क्रीडा संकुलातील क्रीडांगणाचे पुरते हाल झाले आहेत़ ६० लाखांचा निधी सांर्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करुनही कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलची मैदाने दुर्लक्षीतच आहेत़ तर दुसरीकडे दस्तुरखुद्द क्रीडाधिकारीच उत्तम आसनव्यवस्थेसह एसीत थंड हवेचा आनंद घेत आहेत़ खेळाचा आत्मा असलेले संकुलातील मैदाने मात्र गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या अभावाने गुदमरुन जात आहेत. जानेवारी २०१४ मध्ये क्रीडा कार्यालयाने ४० लाख रुपये सा़बां़ विभागाकडे वर्ग केले़ यातूनच बास्केटबॉलच्या मैदानासह क्रीडा कार्यालयातील फर्निचरच्या कामासह काही मैदानातील तारेचे कुंपण बांधण्यासाठी खर्च करण्यात आले़ निधी अपुरा असल्याचे सांगत पुन्हा सा़बां़ विभागाकडे २० लाख नोव्हेंबर २०१४ मध्ये वर्ग करण्यात आले़ यानंतरही मैदान दुरुस्तीचे काम झाले नाही़ ई-टेंडरिंगचे कारण दाखवत अद्यापही काम गुलदस्त्यातच आहे़ त्यातच क्रीडा खात्याने यंदाच्या वर्षातील काही खेळांच्या स्पर्धा खाजगी मैदानाच्या कुबड्या घेत पार पाडल्या. जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी लातूरचे नाव रोशन केले आहे़ मराठवाड्यातही लातूरचे क्रीडा संकुल प्रसिद्ध आहे़ मैदानाचे हाल झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून खेळाडूंच्या समस्या वाढल्या आहेत़ त्यामुळे सध्या तरी क्रीडा अधिकारी तुपाशी अन् खेळाडू उपाशी अशी अवस्था लातूरच्या क्रीडा क्षेत्राची झाली आहे़ व्हॉलीबॉलच्या मैदानावर बारीक खडी असल्याने नित्यनियमाने सकाळ- संध्याकाळच्या सत्रात सराव करणाऱ्या खेळाडुंचे बेहाल होऊन त्यांचे पाय घसरत आहेत़ कबड्डीच्या मैदानावर असलेली मोठी खडी तर या मैदानाचे वास्तव्य दाखवत आहे़ खो-खो खेळाचेही हाल न सांगितलेलेच बरे, अशी अवस्था सध्या या तिन्ही मैदानाची झाली आहे़ काही दिवसांपूर्वी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या मैदानाची पाहणी केली होती़ यामुळे खेळाडुंमध्ये आशेचा किरण जागृत झाला होता़ मात्र तोही मावळल्याने खेळाडूंतून नाराजीचा सूर उमटत आहे.