औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यूला ब्रेक लागला. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर २६ कोरोना रुग्णांची भर पडली आणि ३१ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार १३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ६७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २६ रुग्णांत मनपा हद्दीतील १८, ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २७ आणि ग्रामीण भागातील ४, अशा एकूण ३१ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
विशालनगर ३, एन दोन, सिडको ३, मेहरनगरी, पिसादेवी १, एन चार, हनुमान चौक १, एन सहा, संभाजी कॉलनी २, अयोध्यानगर १, एसबीएच कॉलनी १, अन्य ६
ग्रामीण भागातील रुग्ण...
पैठण १, अन्य ७