शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

नरेगाच्या मजुरांना बँकांतून मजुरीस विलंब

By admin | Updated: June 19, 2014 00:17 IST

विठ्ठल भिसे, पाथरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना वेळेच्या आत मजुरी मिळावी, यासाठी शासनाने योजनेमध्ये आमूलाग्र बदले केले़

विठ्ठल भिसे, पाथरीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना वेळेच्या आत मजुरी मिळावी, यासाठी शासनाने योजनेमध्ये आमूलाग्र बदले केले़ पंचायत समिती स्तरावरून योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना थेट आॅनलाईन मजुरी बँकांमार्फत देण्याची पद्धतही सुरू झाली़ असे असले तरी बँकेतून मात्र मजुरी मिळण्यास मोठा कालावधी लागत असल्याने मजुरांच्या नशिबी येरे माझ्या मागल्या प्रमाणे झाले आहे़ प्रशासनातील त्रुटीमुळे या योजनेमध्ये अडथळे निर्माण होऊ लागले आहेत़ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) राज्यामध्ये २००८ पासून राबविण्यास सुरुवात झाली़ या योजनेंतर्गत मजुरांना काम उपलब्ध करून देणे आणि गावचा विकास करणे हा उद्देश समोर ठेवण्यात आला़ केंद्र शासनाकडून ही योजना राबवित असताना अनेक जाचक अटी तयार करण्यात आल्याने सुरुवातीला काही वर्षात या योजनेमध्ये काम करण्यास अधिकारी आणि कर्मचारी पुढे येत नव्हते़ मजुरांना मजुरी देण्यापासून या योजनेत अनेक अडथळे निर्माण झाले होते़ राज्य शासनाने मागील काही वर्षांत योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आमूलाग्र बदल केले़ पूर्वी मजुरांसाठी हस्तलिखित हजेरीपट वापरले जायचे़ यामुळे अशा हजेरी पटातून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार घडत असत़ कालांतराने शासनाने मजुरांना कामावर मजुरीसाठी आॅनलाईन मजुरीचे रजिस्टर तयार केले़ त्यामुळे जेवढे मजूर कामावर असतील तेवढ्याच मजुरांची आॅनलाईन पद्धतीने नोंद केली जायची़ यामुळे बोगस मजुरांवर आळाही बसला़ काम करूनही मजुरांना दोन-दोन महिने मजुरी मिळत नसल्याने कालांतराने काही मजूर कामावर येणे बंद करू लागले़ पुन्हा योजनेमध्ये बदल करीत मजुरांची मजुरी बँकेत धनादेशाद्वारे न देता थेट आॅनलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ बाराशे मजुरांची समस्यापाथरी तालुक्यात मनरेगा योजनेअंतर्गत २६ सिंचन विहिरी, एक नाला सरळीकरण, तीन शेततळे आणि सात रोपवाटिका अशी कामे सुरू असून, या कामावर साधारणत: १ हजार २०० मजूर उपस्थित असल्याचा अहवाल आहे़ पंचायत समितीकडून या मजुरांना आॅनलाईन पद्धतीने मजुरी त्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवून देण्यात आली खरी़ परंतु, मजूर बँकेत चकरा मारूनही त्यांच्या खात्यात मात्र मजुरीची रक्कम मात्र जमा झाली नाही़ पाथरी पंचायत समितीच्या अंतर्गत कामावर असणाऱ्या मजुरांना २० एप्रिल २०१४ पासून आॅनलाईन मजुरी देण्यास सुरुवात झाली़ मजुरांना यामुळे वेळेत कामाची रक्कम मिळेल, असे वाटत असताना आॅनलाईन पद्धत मात्र आता अडचणीची ठरू लागली आहे़ महिना-महिना मजुरांची मजुरी आॅनलाईन होऊनही बँक खात्यामध्ये मात्र मजुरीची रक्कम जमा होत नाही़ यामुळे प्रशासनाने यातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी आता केली जाऊ लागली आहे़