गजेंद्र देशमुख, जालनाजिल्ह्यात कृषी विभाग व सांख्यिकी विभागाच्या वतीने मूल्यमापन होणार आहे. कृषी विभागाने मूल्यमापन सुरु केले आहे. शेततळ्यांची परिस्थिती करावयाच्या सुधारणा व झालेला फायदा तसेच अन्य बाबी यात तपाण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जेमतेमच आहे. त्यामुळे बारामाही शेती करणे शेतकऱ्यांना जिकिरीचे आहे. यासाठी कृषी विभाग, महाराष्ट्र रोजगार हमी योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनेक गावांत शेततळ्यांची निर्मिती करुन शेती फुलविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु अनेक ठिकाणी शेततळे करताना शासनाचे निकष अथवा केवळ निधी हडपण्यासाठी शेततळी केली जातात. या शासनाचा हेतू साध्य होताचे असे नाही. निधीही हडप होतो. आतापर्यंत केलेली शेततळे उपयोगात आहे, त्यांची परिस्थिती कशी आहे, तळ्यांचा उपयोग कितपत होतो, आज काय सुधारणा करण्याची गरज आहे याची तपासणी तसेच मूल्यांकन होणार आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने असे मूल्यमापन सुरु झाले असल्याचे सांगण्यात आले. या मूल्यमापनाच्या वेळी अनेक बोगस प्रकारही समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक गावात शेततळ्याचे थातूरमातूर काम करुन अनुदान लाटण्यात आल्याच्याची चर्चा आहे. मूल्यमापनाच्या अनुषंगाने हे पितळी उघडे पडण्याची शक्यता आहे.आठ तालुके मिळून सात वर्षांत तब्बल ८०५ शेततळी तयार करण्यात आली आहेत.सात वर्षात कोट्यवधी रुपये खर्चून ८०५ शेततळीतालुका२००५-०६२००६-०७२००७-०८२००९-१०२०११-१२एकूणजालना२४९१२११२७९३५३बदनापूर१२५३६२७०१३४भोकरदन१५७०२६३९जाफराबाद१६३७२८४५परतूर००४५२१३०मंठा००२००२अंबड००१४४८८१०६घनसावंगी०३०००६६९८एकूण५११५७८२९५७८८०५
आता शेततळ्यांचे होणार मूल्यमापन
By admin | Updated: July 12, 2014 01:16 IST