औरंगाबाद : दरवर्षी अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी शहरात कोट्यवधी रुपयांची सिगारेट मार्केटमधून गायब होते. अर्थसंकल्प जाहीर होताच हा माल बाहेर येतो. नवीन दराने हा माल विकण्यात येतो. दरवर्षीच्या या ‘माल’प्रॅक्टिसला कंटाळून शहरातील पान विक्रेत्यांनी भारतीय सिगारेट न विकता विदेशी सिगारेट विक्रीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.भारतीय बनावटीच्या चार ते पाचच ब्रँडची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काल-परवापर्यंत आठ-नऊ रुपयांना येणारी सिगारेट आज अचानक बारा-तेरा रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अनेक ठिकाणी तर मालच नसल्याने ग्राहक मिळेल त्या दरात सिगारेट खरेदी करीत आहेत. अनेकदा तर ग्राहक आणि पानटपरीचालकांमध्ये या दरवाढीमुळे वादही होत आहेत.साधारणपणे विक्रेत्याला पूर्वी सिगारेट एमआरपी दरापेक्षाही पाच ते सहा रुपयांनी कमी मिळत होती. आता तर एमआरपीपेक्षाही जास्त दराने त्याला सिगारेट विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे तो नाइलाजास्तव अधिक दराने सिगारेट विकतोय. अर्थसंकल्पापूर्वी सिगारेटचा काळाबाजार सुरू झालाय. कारण नसताना ग्राहकांची ही लूट सुरू आहे. काळ्याबाजारात कोट्यवधी रुपयांची कमाई काही मंडळी करीत आहे.छोट्या विक्रेत्यांनी या प्रकारच्या विरोधात आवाज उठविला तर एमआरपीपेक्षा कमी दराने सिगारेट देऊन त्याचे तोंड बंद केले जाते. पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा काळाबाजार सुरू आहे. काही व्यापाऱ्यांच्या मते या दोन्ही विभागाच्या पाठबळावरच हा काळाबाजार करण्यात येतोय. आजपर्यंत शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांवर धाडी का पडल्या नाहीत. नेहमी छोटे मासेच यांच्या गळाला का लागतात, असा प्रश्नही व्यापारी उपस्थित करीत आहेत. दरम्यान, या काळ्याबाजाराला कंटाळून शहरातील पानविक्रेता संघटनेने एक बैठक घेतली. बैठकीत भारतीय सिगारेट अधिक पैसे देऊन खरेदी करून ग्राहकांचा रोष ओढावून न घेता विदेशी सिगारेट विकण्याचा निर्णय घेण्यात आला. विदेशी सिगारेटचे महत्त्व आम्ही ग्राहकांना पटवून देऊ, असे संघटनेचे उपाध्यक्ष शेख जलील यांनी सांगितले.असा सुरू आहे व्यवहारसिगारेटएमआरपी विक्रेत्यांना मिळणारा दरविल्स ७० ७०छोटा गोल्ड६० ६५मोठा गोल्ड ८५ ११०ब्रिस्टॉल ४५ ५०छोटा फोर स्कोअर ४५ ४५क्लासिक १७० २२०
आता सिगारेटचाही काळाबाजार सुरू!
By admin | Updated: July 9, 2014 00:51 IST