शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

आता ‘अबकड’ ऐवजी ‘एबीसीडी’

By admin | Updated: July 20, 2014 00:36 IST

विठ्ठल भिसे, पाथरी ग्रामीण भागात अंगणवाड्यातून बालकांना केवळ सकस आहारच दिला जात होता.

विठ्ठल भिसे, पाथरीग्रामीण भागात अंगणवाड्यातून बालकांना केवळ सकस आहारच दिला जात होता. चिमूकल्यांना शिक्षण मात्र मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले अन् अंगणवाडीतील बालकांची संख्या कमी होऊ लागली. परंतु विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर अंगणवाड्या आयएसओ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आता आयएसओ झालेल्या अंगणवाड्यातून चिमूकली बालके अबकड ऐवजी एबीसीडीचे धडे गिरवू लागली आहेत. पाथरी तालुक्यात सहा अंगणवाड्या आयएसओ झाल्या असून आणखी १० अंगणवाड्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पूर्वीपासून अंगणवाड्यांना इमारती नव्हत्या. अनेक ठिकाणी अंगणवाड्या झाडाखाली भरविल्या जात असत. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ दिला जात होता. त्यामुळे अंगणवाड्यामध्ये खाऊसाठीच बालकांना पाठविले जात होते. अंगणवाड्या म्हणजे कुपोषण मुक्तीचे केंद्र बनले होेते. आनंददायी शिक्षणाचा अभाव असल्याने अंगणवाडीतून पहिल्या वर्गात येणाऱ्यांना मराठी मूळाक्षरे ‘अ ब क ड’ वाचता येत नव्हते. यामुळे ग्रामीण भागात नर्सरीपासूनच्या खाजगी इंग्रजी शाळा सुरू झाल्या आणि अंगणवाडीतील बालकांची संख्या घटू लागली. विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर अंगणवाड्या आयएसओ करण्याबाबतचा निर्णय झाला. लोकसहभागातून अंगणवाड्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांचा सहभागही वाढला. तालुक्यात सहा अंगणवाड्या आयएसओ झाल्या आहेत. या अंगणवाड्यांचे आॅडीट झाल्यानंतर अंगणवाड्यातील कार्यकर्त्यांना यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. आयएसओ झालेल्या अंगणवाडीतील बालके ए बी सी डीचे बोल बोलू लागले आहेत. १९ अंगणवाड्या प्रस्तावितमुलभूत सोयीसुविधा लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील पंधरा अंगणवाड्यामध्ये लोकसहभागाचे काम सुरू करण्यात आले आहे. गावात जावून ग्रामस्थांशी चर्चा करून घरोघरी फिरून अंगणवाडी पर्यवेक्षिका काम करीत आहेत. यामध्ये लोणी, गुंज, कान्सूर, सुरताबाई तांडा, निवळी, पाटोदा, वडी, खेडूळा, झरी, देवनांदरा, बांदरवाडा, मरडसगाव, बानेगाव, जवळा झुटा, नाथरा, तुरा या गावांचा समावेश आहे. प्रकल्प अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी पर्यवेक्षिका, आर.एस. पठाण, जे.पी. राजूरकर, एम.बी. गायकवाड, व्ही.एम. कुलकर्णी यांनी बैठका घेऊन हा कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. सजावटीने रंगल्या अंगणवाड्याअंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी या सहाही अंगणवाड्यामध्ये रंगरंगोटी, आॅईलपेंट, बोलके चित्र, बालकांसाठी टेबल, खिडक्यांना पडदे, वॉटर फिल्टर, कचराकुंड्या, झोपाळा, कंपाऊंडवॉल, घसरगुंडी, संगणक आणि विद्यार्थ्यांना एकच ड्रेसकोड देण्यात आल्यामुळे या अंगणवाड्या नटलेल्या दिसून येत आहेत. सहा अंगणवाड्या आयएसओपहिल्या टप्यामध्ये पाथरी तालुक्यातील सहा अंगणवाड्यांचे आयएसओसाठी २५०० रुपये भरून नामांकन करण्यात आल्यानंतर पारजात कंनस्लटंसी औरंगाबाद संस्थेच्या वतीने एप्रिल महिन्यामध्ये आॅडीट करण्यात आले. यामध्ये बाबूलतार अंगणवाडी क्र. २, पाथरगव्हाण अंगणवाडी क्रमांक १ आणि २, रेणाखळी, हादगाव क्र. १, विटा क्रमांक २ या अंगणवाड्यांचा समावेश आहे.