ाांदेड : यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी पावसाचे आगमन झाले नसल्याने शेतमालाच्या दरात तेजी जाणवू लागली होती. मात्र या महिन्यात हळदीसह सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजार समिती आवारात सध्या शेतमालाची अल्प आवक असली तरी खरेदी-विक्री मात्र बऱ्यापैकी असल्याचे दिसते. यंदा मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने बहुतांश भागात पेरण्या उशिराने झाल्या. याचा परिणाम पुढच्या हंगामात उत्पनात घट होणार असे वाटत असल्याने शेतमाल बाजारात सर्वच शेतमालाचे दर वाढू लागले होते. परंतु आॅगस्ट-सप्टेंबर मध्ये झालेल्या पावासामुळे पून्हा बाजारातील दरात घसरण झालेली आहे. गेल्या महिन्यात मोंढा बाजारात हळदीचे दर ६ हजार रुपयापासून ८ हजार रुपयापर्यंत पोहोचले होते. तर आजघडीला दरामध्ये जवळपास दोन हजार रुपयाची घसरण जाणवत असून ५ हजार ते ६ हजार रुपयांवर भाव आले आहेत. याशिवाय सोयाबीनचे भाव ५ हजार ते ४८०० रुपये क्विंटलवरुन ३४५० रुपये क्विंटलवर येवून ठेपले आहेत. (प्रतिनिधी)
न्हळद-सोयाबीनच्या दरात घसरण
By admin | Updated: September 17, 2014 00:26 IST