शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

पुढील आंदोलन उत्तर नगरचे ‘दूध बंद’

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीतर्फे आज क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘साखरसम्राटांना आवरा’ अशा घोषणांनी परिसर

औरंगाबाद : जायकवाडी पाणी नियोजन व हक्क संघर्ष समितीतर्फे आज क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘साखरसम्राटांना आवरा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यापुढील आंदोलन उत्तर नगर जिल्ह्यातील ‘दूध बंद’ असून जनतेने नगरचे दूध घेणे बंद करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी केले आहे. आजच्या निदर्शनात सतनामसिंग गुलाटी, मंगल ठोंबरे, राहुल मगरे, दत्तू पवार, संजय नागरे, गणेश वडकर, डॉ. विजय डक, सुशील भिसे, विजय काकडे, कल्याण देहाडे, खमरखान, सीताराम सपकाळ, संतोष पवार, संतोष चौधरी, अशोक चक्रे, अशोक पवार आदींसह गेवराई, पैठण व औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाग घेतला. यासंदर्भात जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, जायकवाडी धरणामध्ये समन्यायी पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय शासकीय स्तरावर दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता होती. त्यामुळे मराठवाड्यास त्यांच्या हक्काचे पाणी मिळूच न देण्याचा चंग उत्तर नगर जिल्ह्यातील साखरसम्राटांनी बांधला आहे. गतवर्षी कोल्हे- पिचड विरोध करीत होते. आता विखे विरोध करीत आहेत. जायकवाडीत पाणी सोडण्याची वेळ आली की न्यायालयीन प्रकियेत अडकवून टाकण्याचे धोरण साखरसम्राटांनी अवलंबिले आहे. मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मदत करण्याऐवजी स्वत:च्या पोळीवर तूप ओढण्याच्या धोरणाविरोधात आमची ही निदर्शने आहेत. जायकवाडीत वरील धरणांतून २७ टीएमसी पाणी सोडणे आवश्यक आहे. तरीही मुख्यमंत्री न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून २२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, हे ओळखून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकवून टाकून पाणी सोडण्याची प्रक्रिया लांबविण्याचे धोरण उत्तर नगरच्या साखरसम्राटांनी स्वीकारल्याचे दिसून येते. कर्जत, जामखेड, नगर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व शेवगाव हे तालुके दुष्काळी आहेत. त्यांच्याबद्दल या मंडळींनी कधी सहानुभूती दाखविलेली नाही. \जायकवाडी धरणातून फक्त मराठवाड्यासाठी पाणी मिळत नाही, तर शेवगाव व नेवासा या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे. तेथील पाच साखर कारखाने जायकवाडीच्याच पाण्यावर अवलंबून आहेत.४ तसेच शंभर गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा जायकवाडीतूनच केला जातो, याकडेही जयाजी सूर्यवंशी यांनी लक्ष वेधले आहे. दूध बंद आंदोलनाबद्दलही त्यांनी सूतोवाच केले.