उस्मानाबाद : तालुक्यातील नांदुर्गा शिवारात नवजात स्त्रिजातीचे अर्भक फेकून पलायन करणाऱ्या महिलेविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी सकाळी समोर आली असून, अर्भकास उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील नांदुर्गा शिवारात एका नवजात स्त्रि जातीचे अर्भक नांदुर्गा गावाजवळील उकिरड्यावर नवजात स्त्रि जातीचे अर्भक असल्याची माहिती बेंबळी पोलिसांना मिळाली होती़ या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून अर्भकास जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ या प्रकरणी नांदुर्गा गावचे पोलिस पाटील हनुमंत चंदर देवकते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी एका अनोळखी महिलेस ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि प्रशांत पाटील हे करीत आहेत़
नवजात अर्भक फेकून मातेने केले पलायन
By admin | Updated: September 2, 2014 01:51 IST