संजय लव्हाडे , जालनागणरायासोबत पावसाचेही दमदार आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही आनंदले आहेत. पावसामुळे बाजारपेठेत सर्व प्रकारच्या धान्याची आवक वाढत आहे; मात्र उठाव नसल्यामुळे दरामध्ये फारसा चढ-उतार नाही. नवीन मुगाची आवकही सुरु झाली आहे.मुगाची आवक आणि व्यापार यादृष्टीने जालना बाजारपेठ मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. जालना बाजारपेठेतील मुगाला जवळपास सर्वच राज्यांमधून चांगली मागणी असते. दरवर्षी पोळ्यापासून नवीन मूग बाजारात येण्यास सुरुवात होते. यावर्षीही मुगाची आवक सुरु झाली असून दररोज शंभर पोते इतकी आवक आहे. ओलसर मूग ५००० ते ६००० आणि चांगल्या मुगाचे भाव ६५०० ते ७५०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत.बाजरी आणि तुरीची आवक दररोज प्रत्येकी दोनशे पोते असून बाजरीत शंभर रुपयांची आणि तुरीच्या दरात दोनशे रुपयांची मंदी आहे. बाजरीचे भाव १२५० ते १५०० रुपये तर तुरीचे भाव ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. सोयाबीन आणि हरभऱ्याची आवक दररोज प्रत्येकी तिनशे पोते इतकी असून दोन्हींच्या दरात प्रत्येकी शंभर रुपयांची मंदी आली. सोयाबीनचे दर ३५०० ते ३६०० आणि हरभऱ्याचे दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत.गहू व ज्वारीची आवक दररोज प्रत्येकी चारशे ते पाचशे पोते असून भाव स्थिर आहेत. मिल क्वालिटी गहु १५०० ते १६२५ आणि चांगला गहु १८०० ते २३०० रुपये प्रतिक्ंिवटल तसेच काळी ज्वारी १३०० ते १४२५ आणि चांगल्या प्रतिच्या ज्वारीचे भाव १७०० ते २८०० रुपये प्रतिक्ंिवट असे आहेत.शेंगदाणा क्ंिवटलमागे ५०० रुपयांनी स्वस्त झाला असून भाव ७३०० ते ८३०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. साबूदाणा मात्र ५०० रुपयांनी महागला असून भाव ७५०० ते ८४०० रुपये प्रतिक्ंिवटल असे आहेत. सर्व प्रकारच्या डाळी ५० ते १०० रुपयांनी स्वस्त झाल्या.वनस्पती तूप डब्यामागे ८० रुपयांनी स्वस्त झाले असून ९०० ते ९२० रुपये प्रतिडबा असे भाव आहेत. साखरेचे दर स्थिर असून भाव ३१५० ते ३३०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत.
मोंढ्यात नवीन मुगाची आवक सुरु !
By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST