लातूर : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त धडकताच जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये बाजारपेठा बंद ठेऊन आदरांजली वाहण्यात आली़ लातूरसह औसा, रेणापूर, देवणी, जळकोट, निलंगा, शिरुर ताजबंद, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, किनगाव व अन्यही गावांत स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला़ तसेच गोपीनाथ मुंडे यांना ठिकठिकाणी विविध पक्ष-संघटनाच्या वतीने शोकसभेतून आदरांजली वाहण्यात आली़ लातूर शहरात सकाळपासूनच चिंतेचे वातावरण होते़ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त येताच भाजपा कार्यकर्त्यांसह विविध पक्ष-संघटनांनी त्यांना आदरांजली वाहिली़ शहरातील काही भागात व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन श्रद्धांजली व्यक्त केली़ देवणीत बाजारपेठ बंद ठेवून शोकसभा देवणी : कें द्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त कळताच देवणी ग्रामस्थांच्या वतीने मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली़ तसेच देवणी शहरातील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली़ यावेळी भाजपाचे तालुकाध्य वैजिनाथ अष्टुरे, भाजपाचे नेते हावगीराव पाटील, बस्वराज पाटील, गुंडप्पा धनुरे, मनोहर पटने, ओम धनुरे, सरपंच देविदास पतंगे, उपसरपंच बाबूराव इंगोले व्यापारी संघाचे अध्यक्ष माणिकराव लांडगे, चेअरमन माधव धनुरे उपस्थित होते़ शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या निर्मितीत गोपीनाथ मुंडे यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे़ त्यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच शिरूर अनंतपाळकरांनी बाजारपेठ बंद ठेवून मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली़ बाजारपेठ बंद ठेवून अहमदपुरात आदरांजली अहमदपूर : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाची बातमी कळताच शहरामध्ये शांतता पसरली. या घटनेने सर्वसामान्य माणूसही गहिवरला असल्याचे दिसून येत होते. अहमदपूर ग्रामस्थांच्या वतीने शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख, माजी सभापती अशोक केंद्रे, माजी नगराध्यक्ष सुधाकर नागरगोजे, राजकुमार मजगे, भाजपा तालुकाध्यक्ष बाबूराव जंगापल्ले, राजकुमार पाटील, सरपंच प्रकाश देशमुख, नाथराव केंद्रे, राम बेल्लाळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. औश्यात बंद अन् शोकसभा़़़ औसा : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनाचे वृत्त कळताच औसा तालुक्यावर शोककळा पसरली. या घटनेमुळे औशातील बाजारपेठही बंद झाली. दुपारी १ वाजता हनुमान मंदिराजवळ चौकात शोकसभाही घेण्यात आली. यावेळी सुशील बाजपाई, मुक्तेश्वर वागदरे, अरविंद कुलकर्णी, सूर्यकांत शिंदे, सुनील उटगे, समीर डेंग, अशोक कुंभार, जयश्री उटगे, सतीश शिंदे, महादेव कटके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. चाकुरात गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली चाकूर : के ंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच चाकूर शहरातील व्यापार्यांनी बंद पाळून स्वामी विवेकानंद चौकात मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली़ यावेळी काँग्रेसचे राधाकिशन तेलंग, विलासराव पाटील, सेनेचे सुभाष काटे, भाजपाचे मेघराज बाहेती, सिद्धेश्वर पवार, वसंतराव डिगोळे, बालाजी पाटील चाकूरकर, किसनराव रेड्डी, राजाराम माने उमाकांत शेटे, शिवशंकर हाळे, नंदकुमार पवार, ओमप्रकाश गोडभरले ज्ञानेश्वर शेटे, बस्वराज निला आदीची उपस्थिती होती़ औराद शहाजानी : केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्या अपघाती निधनाची बातमी औराद शहाजानी ग्रामस्थांना समजताच येथील महाराष्ट्र विद्यालयात खाग़ोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ उदगीरातून हजारो कार्यकर्ते नाथर्याकडे उदगीर : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे उदगीरचे मोठे नुकसान झाले आहे़ उदगीर व सर्वच तालुक्यातील दैनंदिन व्यवहार बाजारपेठ बंद ठेवून यांना श्रद्धांजली वाहण्यात आली़ गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने गोरगरीबांचा कैवारी हरवला असल्याची प्रतिक्रीया अॅड़ प्रभाकर काळे, अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी व्यक्त केली़ जळकोटमध्ये सर्वपक्षीय शोक जळकोट : जळकोट शहरात शोकसभा घेऊन गोपीनाथ मुंडे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मन्मथप्पा किडे, अर्जुन आगलावे, बालाजी केंद्रे, सोमेश्वर सोप्पा, उस्मान मोमीन, सत्यवान पांडे आदी उपस्थित होते़
जिल्ह्यात बाजारपेठ बंद ठेवून मुंडेंना चाहत्यांची श्रध्दांजली
By admin | Updated: June 4, 2014 01:30 IST