औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे अंतर्गत व बाह्यसौंदर्यीकरणाचे काम मुंबईच्या कंत्राटदाराला देण्याचे स्थायी समितीने निश्चित केले. ग्राफिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या संस्थेची ९.९९ टक्क्यांच्या जास्त दराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. ही संस्था मुंबईतील आहे. शलाका इन्फ्रास्ट्रक्चर, मॅस्कॉट कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदारांनीही निविदा भरली होती.दोन वर्षांपासून संग्रहालयाचे काम सुरू आहे. बांधकाम पूर्ण झाले आहे. शनिवारी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामाची पाहणी केली. ठाकरे यांच्या संकल्पनेतील तो प्रकल्प आहे. कामासाठी पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने मंजुरी दिली. मुंबईतील कंत्राटदाराला ते काम ९.९९ टक्के इतक्या जास्त दरांनी देण्यात आले आहे. तीन कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. डेंग्यूवर नो कॉमेंटस् स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यूवर कुणीही बोलले नाही. सदस्य सविता घडामोडे यांना डेंग्यूसदृश ताप आला होता. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे बैठकीत सदस्य संतापून प्रशासनावर खापर फोडतील, अशी चिन्हे होती. मात्र, त्यावर कुणीही बोलले नाही.
मुक्तिसंग्राम संग्रहालय सजावटीचे काम मुंबईच्या कंत्राटदाराला
By admin | Updated: August 31, 2014 00:40 IST