हिंगोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकुण १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. आणखी ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे २ लाख ९ हजार ४०६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित क्षेत्र आहे. त्यामध्ये हिंगोली तालुक्याचे ५१ हजार हेक्टर, औंढा नागनाथ तालुक्याचे ३७ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. तसेच वसमत तालुक्याचे २६ हजार ४०६ हेक्टर, कळमनुरी तालुक्याचे ३९ हजार आणि सेनगाव तालुक्याचे ५६ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. या संपुर्ण क्षेत्रासाठी जिल्ह्याला १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणे आवश्यक होते. त्यामध्ये हिंगोलीसाठी ३८ हजार २५० क्विंटल, औंढा नागनाथसाठी २७ हजार ७५० क्विंटल, वसमतसाठी १९ हजार ८०४ क्विंटल व कळमनुरीसाठी २९ हजार २५० क्विंटल आणि सेनगाव तालुक्यासाठी ४२ हजार क्विंटल बियाणे गरजेचे होते. त्यानुसार नोंदणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने राज्य शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला आतापर्यंत एकुण १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून ४७ हजार १०९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून महामंडळाकडून ३ हजार ३७९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. आता आणखी ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे जिल्ह्याला आवश्यक आहे. महामंडळाकडून पुन्हा ४ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली.उगवण क्षमता पाहून बीज प्रक्रिया करावी-नाब्देशेतकऱ्यांनी शक्यतो स्वत:कडील बियाणांची पेरणी करावी. तत्पुर्वी त्या बियाणांची उगवण क्षमता पाहून बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन नाब्दे यांनी केले आहे. कमीत-कमी ७० ते १०० मि. मी. पाऊस झाला तरच शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करावा. पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असेही नाब्दे म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)प्रत्येक दुकानावर कृषी विभागाचा कर्मचारीखरीप हंगामाच्या कालावधीत कृषी केंद्रांवरून बियाणे व खतांची विक्री केली जाते. अशा वेळी शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा अडवणूक होवू नये, यासाठी प्रत्येक खासगी कृषी केंद्रांवर कृषी विभागाचा कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. त्यानुसार औंढा नागनाथ तालुक्यात ३६, वसमत तालुक्यात ४१, हिंगोली तालुक्यात ४३, कळमनुरी तालुक्यात ३२ व सेनगाव तालुक्यात ३९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे नाब्दे म्हणाले.भरारी पथकांची स्थापनाशेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक तालुकास्तरावर कृषी विभागाच्या वतीने एक भरारी पथक नियुक्त करण्यात येणार असून त्यामध्ये पाच कर्मचारी राहणार आहेत. या शिवाय जिल्हास्तरावरही एक भरारी पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे नाब्दे म्हणाले.
आणखी हवे ८ हजार ८६६ क्विंटल बियाणे
By admin | Updated: June 20, 2014 00:07 IST