शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

पाण्यासाठी मनसेचे आंदोलन

By admin | Updated: January 31, 2017 00:11 IST

लातूर : शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.

लातूर : शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लातूर शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये मळवटी रोड परिसरातील सिद्धेश्वर नगर, अब्दुल कलाम नगर, जयनगर, सनतनगर, बरकत नगर, हरिभाऊ नगर आदी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात पाईपलाईनही करण्यात आली नाही. त्यामुळे कुपनलिका आणि बोअरचा नागरिकांना आधार घ्यावा लागतो. महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या बोअरला मोटार बसविण्यात आली नाही. त्यामुळे बरकतनगर, मळवटी रोड व सनतनगर या भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. काही भागांत पथदिवे आणि विजेची सोय करण्यात आली नाही. तर आदमनगर, हिमायत नगर, सिद्धेश्वर नगर, सम्राट अशोक नगर, अब्दुल कलाम नगर आदी नगरांत पक्क्या रस्त्यांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. हरिभाऊ नगर येथील खणी भागात गटारींची व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल होत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मूलभूत प्रश्नांसाठी नागरिकांनी मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र या समस्या प्रशासनाने सोडविल्या नाहीत. मनपा प्रवेशद्वारासमोर मनसेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)