सत्तार हे कोणाचीही भिडभाड न ठेवता स्पष्ट बोलणारे नेते म्हणून परिचित आहेत. लोकांमध्ये मिसळण्याचा त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या लोकप्रियतेची गुरुकिल्ली आहे. गव्हाली येथे ते कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, त्यांनी डफडं वाजविणाऱ्या दलित समाजातील पुंडलिक कांबळे यांना हाक मारून बोलावले व त्यांना उद्घाटनाचा मान दिला. यामुळे गावकरी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. एऱ्हवी ‘ए वाजव आणि बंद कर’ या शब्दांपलीकडे फारसे कोणी लक्ष देत नसल्याने अचानक मंत्र्यांनी सन्मान दिल्यानंतर कांबळे हे भारावून गेले होते. दरम्यान, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा हा पहिलाच प्रसंग नाही. कधी गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विद्यार्थी, महिला बचत गट तर कधी गावातील अपंग व्यक्तींच्या हस्ते अनेकवेळा त्यांनी उद्घाटन केले आहे. त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत चाहत्यांचा कायम गराडा पहायला मिळतो. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, नंदकिशोर सहारे, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, तालुकाप्रमुख धैर्यशील तायडे आदींची उपस्थिती होती.
फोटो :
260921\img_20210926_191759.jpg
क्याप्शन
एका दफडा वाजविणाऱ्या इसमाच्या हस्ते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विकास कामाचे उदघाटन केले त्यांच्या सोबत दफडा वादक पुंडलिक कांबळे दिसत आहे