शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

सेलूत लाखो लिटरची पाणीचोरी

By admin | Updated: April 26, 2016 23:50 IST

मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याची चोरी

मोहन बोराडे, सेलूनिम्न दुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याची चोरी आणि अपव्यय होत असून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची बाब मंगळवारी ‘लोकमत’ने सेलू शहरात केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आली. तर दुसरीकडे शहरातील जाकेर हुसेननगरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचेही या पाहणीत आढळले.वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत निम्नदुधना प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होेतो. दररोज सुमारे २५ लाख लिटर पाणी जलवाहिनीद्वारे शहरवासियांना पुरविले जाते. शहरापासून १५ कि.मी. अंतरावरुन हे पाणी आणले जाते. पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी या पंधरा कि.मी. अंतराच्या जलवाहिनीला ठिकठिकाणी व्हॉल्व्ह बसविले आहेत. या व्हॉल्व्हला असलेल्या गळतीच्या जागी अनेकांनी पाईप टाकून पाणी चोरण्याचा प्रकार केला आहे. पाणी चोरी प्रश्नी ‘लोकमत’ने संपूर्ण १५ कि.मी. अंतराच्या जलवाहिनीचे स्टींग आॅपरेशन केले असता, पाच ठिकाणी चोरून पाणी पळविले जात असल्याचे निदर्शनास आले. काहींनी शेती भिजविण्यासाठी तर काहींनी हॉटेल, वीटभट्टी व्यवसायासाठी हे पाणी नेल्याची बाब पुढे आली. तसेच या पाहणीत या मार्गावरील काही निवासस्थानांमध्ये व्हॉल्व्हमधील पाणी पळविले आहे.सेलू- परभणी रस्त्यावरील जुन्या जलशुद्धीकरण केंद्रासमोरील व्हॉल्व्हमधून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या व्हॉल्व्हमधून येणारे पाणी दोन कि.मी. अंतरावरील कवडधन पाटीपर्यंत पाटासारखे वाहताना दिसले. जलशुद्धीकरण केंद्र ते कवडधन पाटी या दरम्यान रस्त्याच्या उजव्या बाजूस ठिकठिकाणी व्हॉल्व्हमधून गळती झालेले पाणी साचले आहे. लातूर शहर हंडाभर पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. सुदैवाने निम्न दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करताना कुठलीही अडचण येत नाही. परंतु, असलेल्या पाण्याचा काळजीपूर्वक वापर होण्याऐवजी चोरी आणि अपव्यय होत आहे. हादगाव पावडे पाटीजवळ मुख्य जलवाहिनीतून बाजुलाच असलेल्या दगडी खाणीत पाणी साठविले जात आहे. या पाण्याचा उपयोग हादगाव येथील ग्रामस्थ कपडे धुण्यासाठी करताना पहावयास मिळाले. दुष्काळातही पाण्याचा अपव्यय व चोरी होत असताना न.प.चा पाणीपुरवठा विभाग मूग गिळून गप्प आहे. अनेकवेळा जलकुंभ ‘ओव्हरफ्लो’ होऊन पाण्याचे डबके साचत आहे. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय व चोरी होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यवय होत असताना शहरातील काही भागात मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी दोन-दोन तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. शहरातील हे दोन चित्र सुज्ञ नागरिकांना सुन्न करणारे आहेत.