शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

महापौर व उपमहापौर दोघांनीही पदभार घेतला़

By admin | Updated: November 23, 2014 00:24 IST

आशपाक पठाण , लातूर स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री महापौर झाले़ महापौरपदाचा पदभार घेण्याअगोदरच त्यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा मनपा

आशपाक पठाण , लातूर स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री महापौर झाले़ महापौरपदाचा पदभार घेण्याअगोदरच त्यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा मनपा आयुक्तांकडे दिला़ त्यामुळे सभापतीपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे़ शुुक्रवारी नूतन महापौर व उपमहापौर दोघांनीही पदभार घेतला़ इथेही चर्चा मात्र स्थायी समितीचीच होती़ जातीय समीकरणे लावतच नव्या सभापतीची निवड केली जाईल. काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने पक्ष सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला वापरणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे़ विधानसभा निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर निवडीच्या विषयांवर चर्चा होत्या़ ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेले महापौरपद मिळविण्यासाठी इच्छुक तीन जणांनी नेत्यांकडे लॉबिंगही केली़ एकमेकांचे उणे-दुणेही काढण्याचा प्रयत्न झाला़ आपणच कसे सरस आहोत, याबाबत दूत पाठवून नेत्याला पटविण्याचा कार्यक्रमही जवळपास पंधरा दिवस चालू होता़ विधानसभा निवडणुकी अगोदरच आरक्षण जाहीर झाल्याने ओबीसी प्रवर्गातील नगरसेवकांमध्ये नेत्यांनी स्पर्धा लावली़ विधानसभा निवडणुकीचा निकाल बाहेर येताच अनेकांचे प्रभाग मायनस गेल्याने आपली संधी हुकते काय? असा प्रश्न इच्छुकाला भेडसावत होता़ त्याऊपरही लॉबिंग करीत पक्ष पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणी करीत महापौरपदासाठी अखेरपर्यंत रस्सीखेच केली़ दिग्गजांमध्ये लागलेल्या स्पर्धेत स्थायी समितीचे सभापती अख्तर मिस्त्री यांना महापौरपदाची संधी मिळाली़ काँग्रेसचे संख्याबळ अधिक असले तरी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने अख्तर मिस्त्री बिनविरोध निवडून आले़ त्याचदिवशी स्थायी समितीच्या सभापतीपदी आता कोण? अशी चर्चा सुरू झाली़ नूतन महापौर मिस्त्री यांनी शुक्रवारी पदभार घेतला़ त्यामुळे आता पहिली सर्वसाधारण सभा कधी होणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे़ जातीय समिकरणांंचा मेळ घालण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे आग्रह धरला आहे़ मतदानाचा अधिक टक्का असलेला समाज नाराज होणार नाही, याची दखल घेतली जाईल, अशी चर्चा आहे़ ४मनपात स्थायी समितीचे सभापतीपद सर्वाधिक महत्वाचे आहे़ काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब उर्फ पप्पू देशमुख, डॉ़ रूपाली सोळुंके, रविशंकर जाधव, अ‍ॅड़ किशोर राजुरे यांच्या नावाची चर्चा आहे़ मात्र, माजी मंत्री आ़ दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ़ अमित देशमुख सुचवितील त्यालाच स्थायी समितीच्या सभापतीपदाची संधी मिळणार आहे़ ४उच्च विद्याविभुषित असलेल्या डॉ़ रूपाली सोळुंके यांच्या नावाला सभापतीसाठी संमती मिळणार असून अ‍ॅड़ किशोर राजुरे यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता मनपाच्या राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे़ ४ नूतन महापौर अख्तर मिस्त्री हे स्थायी समितीचे सभापती होते तर उपमहापौर कैलास कांबळे हे स्थायीत सदस्य होते़ दोघांनीही स्थायी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे़ त्यामुळे स्थायी समितीत काँग्रेसचे दोन सदस्य नवे येणार आहेत़