शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयक्षम बना

By admin | Updated: September 15, 2014 00:57 IST

औरंगाबाद : जगातील प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे; परंतु जागतिक स्तरावर ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न मात्र, कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत.

औरंगाबाद : जगातील प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी आहे; परंतु जागतिक स्तरावर ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न मात्र, कमी-अधिक प्रमाणात सारखेच आहेत. महिला कर्मचाऱ्यांनी हे प्रश्न स्वत:पर्यंतच न ठेवता त्यांच्या विरुद्ध आवाज उठवावा. त्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकींसोबत संपर्क वाढविला पाहिजे, असे ‘आयटीएफ’च्या लंडन मुख्यालयाच्या महिला समितीच्या प्रमुख जोडी इवान यांनी म्हटले.महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राज्य परिवहन महामंडळातील महिला कर्मचारी, महिला कामगारांसाठी रविवारी ‘संघटना बळकटीकरणासाठी महिलांशिवाय पर्याय नाही’ याविषयी राज्यव्यापी शिबीर घेण्यात आले. त्यात जोडी इवान यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे होते. यावेळी आशिया पॅसिफिक राष्ट्राच्या महिला समन्वयिका व दिल्ली कार्यालयाच्या प्रमुख निशी कपाही, महिला आघाडीच्या संघटक शीला नाईकवाडे, राज्य उपाध्यक्ष विजय पोफळे, प्रादेशिक सचिव मधुकर बोर्डे, विभागीय सचिव राजेंद्र मोटे यांची उपस्थिती होती. २०१२ ते २०१६ या कालावधीच्या कामगार करारात महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विश्रामगृहांची व्यवस्था करणे, वाहक व कार्यशाळेतील पदावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळी न देणे, महिला वाहकावर प्रवाशांकडून होणारे हल्ले, छेडछाड, शिवीगाळ, धमक्या इ. प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, तसेच लैंगिक छळ तक्रार निवारण समितीने आलेल्या तक्रारीवर पारदर्शक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. जोडी इवान यांनी ९ सप्टेंबरपासून मुंबई, पुणे, नगर, नाशिक भागांत प्रवासात महिला वाहक, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करूनही महिलांना घरी जायला वाहतुकीची सुविधा मिळत नाही. सर्वत्र समस्या सारख्या असताना त्यांचे प्रतिनिधित्व कोणी करीत नाही. डिसिजन मेकर बनण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे निशी कपाही म्हणाल्या. ४नोकरीदरम्यान गर्भपातासारख्या समस्येलाही महिला वाहकांना सामोरे जावे लागत असल्याचे शीला नाईकवाडे यांनी सांगितले.