औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन येथील सिद्धार्थ उद्यानात करण्यात आले आहे. मुक्तिसंग्राम दिन समारंभाच्या पूर्वतयारीची बैठक नुकतीच विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल होते. बैठकीला उपायुक्त विजय फड यांच्यासह महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, मनपा, शिक्षण, क्रीडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ बुधवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होणार आहे. तत्पूर्वी, ८ वाजून ५५ मिनिटांनी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येईल आणि हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे म्हणून अन्यत्र कोठेही सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत ध्वजारोहणाचे आयोजन केले जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य समारंभ सिद्धार्थ उद्यानात
By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST