शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा चालणार कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मागच्यावर्षी लॉकडाऊन लागले आणि मोलकरणींच्या कामावर गदा आली. यावर्षीही पुन्हा तेच होईल की काय, अशी धास्ती ...

औरंगाबाद : मागच्यावर्षी लॉकडाऊन लागले आणि मोलकरणींच्या कामावर गदा आली. यावर्षीही पुन्हा तेच होईल की काय, अशी धास्ती निर्माण झाली असून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आता मोलकरणींसाठी अनेक घरांचे दरवाजे बंद करणारी ठरली आहे. यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, हा प्रश्न आता अनेक मोलकरणींना पडला आहे. मोलमजुरी करणारी एक महिला कमीतकमी ४ ते ५ घरची कामे करत असते. तिच्या घरचे लोकही कामानिमित्त इतर ठिकाणी जात असतात. त्यामुळे तिच्या संपर्कात दररोज येणाऱ्या व्यक्ती पाहून तिच्यापासून आपल्या घरात कोरोनाचा संसर्ग येण्याची भीती बहुतांश गृहिणींना वाटते. त्यामुळे एकवेळ कामाचा ताण पडला तरी चालेल पण मोलकरणींच्या माध्यमातून येणारा काेरोना नकाे, असे म्हणत बऱ्याच गृहिणी मोलकरणींना कामावरून कमी करत आहेत.

आम्हालाही कामासाठी इतरांच्या घरात जाताना आमच्या जीवाची भीती वाटते. पण पोट भरण्यासाठी दुसरा इलाज नसल्याने जिवाचा धोका पत्करून आम्ही इतरांकडे कामे करतो. ज्यांना अजिबातच काम होत नाही, जे वृद्ध आहेत, असेच लोक आम्हाला याही दिवसांमध्ये कामाला बोलवितात, असे काही मोलकरणींनी सांगितले.

चौकट :

मोलकरणींची साधारण संख्या

अंदाजे ६०००

मोलकरणींच्या हाताला मिळेना काम

अंदाजे ३० टक्के

चौकट

एका घरातून कमीतकमी ६०० रुपये

औरंगाबाद शहरातील बहुसंख्य वस्त्यांमध्ये भांडी, धुणे, झाडू- फरशी या सगळ्या कामांसाठी प्रत्येकी ६०० रुपये एवढा दर आकारला जातो. काही ठिकाणी हे दर ७०० रुपये प्रतिकाम एवढेही असतात. अनेक घरांमध्ये धुणे- भांडी आणि झाडू-फरशी अशा सगळ्याच कामासाठी मोलकरीण असते. तर काही घरांमध्ये केवळ भांडी घासण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे एका मोलकरणीला एका घरातून कमीतकमी ६०० रुपये महिना तरी मिळत असतो. पोळ्या किंवा एकवेळच्या स्वयंपाकाचे दर १००० ते २००० यादरम्यान आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये स्वयंपाक करण्याचे काम बहुसंख्य महिलांचे कमी झाले होते. यावेळीही रुग्ण वाढू लागताच एप्रिल महिन्यापासून अनेक घरांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या मोलकरणींना कामावरून कमी करण्यात आले आहे.

चौकट :

घर कसे चालवायचे याचीच चिंता..

पुन्हा एकदा लॉकडाऊन लागले तर आपोआपच बरीचशी कामे बंद होणार. त्यामुळे उत्पन्नही थांबणार. मग घर कसे चालवायचे असा प्रश्न बहुसंख्य मोलकरणींना पडला आहे. ज्या घरी या महिला एकट्याच कमावत्या आहेत किंवा ज्यांचे पती व्यसनी आहेत, अशा महिलांची चिंता तर अधिकच वाढलेली आहे.

चौकट :

कुटुंबाचे पोट कसे भरणार

१. पतीचा व्यवसाय जेमतेम आहे आणि तोदेखील सध्या बंद पडलेला आहे. मुलीचे नुकतेच लग्न ठरले आहे. अशा परिस्थितीत जर पुन्हा लॉकडाऊन लागले तर हातात आहेत, त्यातील निम्म्याहून अधिक कामे बंद होऊन जाणार. त्यामुळे पोट कसे भरायचे हा प्रश्न तर आहेच पण लेकीच्या लग्नासाठी पैसा कसा उभा करायचा, ही चिंता पण आहे.

- मीना शेळके

२. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने एप्रिल महिन्यापासूनच दोन- तीन घरची कामे सुटली आहेत. आता पुन्हा जर रुग्ण अधिक वाढू लागले आणि लॉकडाऊन लागले तर उरलेली कामे जाण्याचीही धास्ती वाटते. आधीच महागाई एवढी वाढत असताना, पोरांचे शिक्षण चालू असताना हातातली कामे बंद होणे, आम्हाला अजिबातच परवडणारे नाही.

- कविता पवार