महेबूब बक्षी, भादाभादा येथील सोसायटीचे रेकॉर्ड अडीच वर्षांपासून गायब करणाऱ्यांचे आता आणखीन नवे प्रकरण उघडकीस आले आहे़ सोसाटीच्या सभासदांना विश्वासात न घेता त्यांच्या संमतीविना परस्पर लाखोचे कर्ज उचलण्यात आले आहे़ ‘लोकमत’ने सोसायटीचा कारभार चव्हाट्यावर आणल्याने एका दिवसात सात सभासदांनी आपली तक्रार संबंधित विभागाकडे नोंदविली आहे़ या सभासदांकडे सोसायटीची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र असतानाही त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज असल्याची नोंद आहे़ त्यामुळे या सभासदांना बेबाकी प्रमाणपत्र मिळत नसल्याने दिसून येत आहे़भादा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर नवीन संचालक मंडळ येवून अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे़ मात्र, अद्यापही संस्थेचे रेकॉर्ड मिळाले नाही़ पूर्वीच्या संचालक मंडळाने मनमानी कारभार केल्याचे दिसून येत आहे़ ‘लोकमत’मधून यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सोसायटीचा नवा कारभार उघडकीस आला आहे़ सोसायटीच्या एका सभासदांचे दोन वेळेस नाव लावून एका नावावर शून्य कर्ज तर दुसऱ्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज उचण्यात आले आहे अन् त्यांचे रेकॉर्ड गायब करण्याचा कारनामा करण्यात आला आहे़येथील सोसायटीचे सभासद कमलाकर शिवलकर, दिनकर शिवलकर, रावसाहेब कात्रे, कमलाकर कुलकर्णी, शरद देशपांडे यांच्या नावे परस्पर सोसायटीचे लाखो रूपये उचलनू स्वत: हडप करण्यात आले आहेत़ ज्या सभासदांनी दरवर्षी कर्जाची परतफेड केली़ त्यांना सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र देवून तसेच किसान क्रेडीट कार्डावर थकबाकी शून्य दाखविण्यात आली आहे़ परंतु, बँकेच्या खात्यावर मात्र लाखोंचा आकडा दाखवण्यात आला आहे़ कर्जासाठी अर्ज, शिफारस पत्र, संमती पत्र, सही नमुना असा कसलाही पुरावा नसताना परस्पर बनावट कागदपत्रांधारे कर्ज उचलून सभासदांची फसवणूक करण्यात आली आहे, अशी तक्रार कमलाकर शिवलकर, योगेश शिवलकर, शरद देशपांडे यांनी संबंधितांकडे दिली आहे़ परंतु, यासदंर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही़विना सहकार, नाही उद्धार या तत्वावर सोसायटीचा कारभार असणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांच्या डोक्यावर लाखोंचा बोजा टाकण्यात आलेला आहे़भादा सोसायटीच्या कारभाराचे नवनवीन प्रकरण बाहेर येत आहेत़ ‘लोकमत’मधील वृत्तानंतर अनेक सभासदांनी आपल्या खात्याची चौकशी करण्यास सुरुवात केली असून सोसायटीच्या कारभारामुळे सभासदांत संभ्रम निर्माण झाला आहे़संस्थेकडून उचलेल्या कर्जाची मी दरवर्षी परतफेड करतो़ त्यामुळे माझ्याकडे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आहे़ परंतु, संस्थेच्या खात्यावर २५ हजार रुपयांची बाकी असल्याचे सचिवांनी सांगितले़ माझ्या परस्पर कर्ज उचलण्यात आले असून त्याची तक्रारही केली असल्याचे कमलाकर शिवलकर यांनी सांगितले़४माझ्या वडिलांचा सन २०१० मध्ये मृत्यू झाला़ त्यांच्यावरील सोसायटीचे कर्ज आम्ही भरले़ त्याची नोंद किसान के्रडिट कार्डवर आहे़ परंतु, आता आणखीन २५ हजार रुपयांचे वडिलांच्या नावे कर्ज असल्याचे सांगण्यात आल्याने गेल्या सहा महिन्यांपासून मी संबंधितांकडे तक्रारी करतो आहे़ परंतु, कार्यवाही शून्य असल्याचे योगेश शिवलकर यांनी सांगितले़४सोसायटीत काही सभासदांची नावे दोन ठिकाणी आहेत़ या सभासदांकडे खाते बेबाकी प्रमाणपत्रांसह किसान के्रडीट कार्ड खात्यावर शून्य थकबाकी दाखविण्यात आली आहे़ परंतु, संस्थेच्या खात्यावर थकबाकी असल्याचे दिसून येत असल्याचे सोसायटीचे सचिव जी़ एस़ साळुंके यांनी सांगितले़
सभासदांच्या संमतीविना उचलले कर्ज
By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST