परभणी: पोलिस भरती प्रक्रिया ६ जूनपासून पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु झाली होती. मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची पात्रता यादी जाहीर केली आहे. येथील पोलिस भरती प्रक्रिया सुरु झाली असून कागदपत्र पडताळणीनंतर मैदानी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या चेस्ट क्रमांक ०१ ते २४०० असलेल्या उमेदवारांची १५ ते २१ जून चाचणी घेण्यात आली होती. त्यांना मिळालेल्या गुणांचा तपशील, जात, भरती, प्रवर्ग, समांतर आरक्षण आदी बाबत माहिती पोलिस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे.या उमेदवारांनी त्यांना मैैदानी चाचणीमध्ये मिळालेले गुण व इतर माहिती पहावी. त्यात काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत पोलिस मुख्यालयातील भरती कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर
By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST