औरंगाबाद : लायन्स क्लबने आतापर्यंत केलेले कार्य अतिशय समाधानकारक आहे; परंतु तुमच्यात यापेक्षा मोठी कामे करण्याची क्षमता आहे. सामान्यांच्या जीवनात आनंद, समाधान पसरेल असेच काम तुमच्या हातून व्हावे. आता मोठी सामाजिक कार्ये हाती घ्या, असे आवाहन लायन्स इंटरनॅशनलचे माजी संचालक नरेश अग्रवाल यांनी येथे केले. लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद मिडटाऊन या समाजसेवी संस्थेच्या शहरातील शाखेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित रौप्यमहोत्सवी सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी नविता अग्रवाल, कमल मानसिंगका, राजेश राऊत, एम.के. अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, डॉ. नवल मालू, तनसुख झांबड, रवी खिंवसरा, शांतीलाल छापरवाल, लौकिक कोरगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. अग्रवाल पुढे म्हणाले की, रौप्य महोत्सव प्रारंभ समजून पूर्ण ताकदीनिशी समाजसेवेच्या कार्यात झोकून द्यावे. क्लबचे अध्यक्ष सीताराम अग्रवाल यांनी प्रास्ताविकात क्लबच्या २५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. क्लबच्या बुलेटीनचेही प्रकाशन झाले. मागील १५ वर्षे अध्यक्षपद भूषविणाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. हिमांशू गुप्ता व मेधा कासलीवाल यांनी केले. अनिल माली यांनी आभार मानले. यावेळी चंद्र्रकांत मालपाणी, कमलेश धूत, नरेश सिकची, श्रीकांत मणियार, जितेन ठक्कर, सुनील देसरडा, महावीर पाटणी, अनिल मुनोत, राजन डोसी, सतीश सुराणा उपस्थित होते. रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या आधी आचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सर्वच धर्मांतील संत, महात्मे सातत्याने आपणास जीवन जगण्याचा मार्ग दाखवीत असतात. ते तुमच्या बुद्धीला पटते; परंतु हृदयात उतरत नाही आणि त्यामुळेच ते तुमच्या जीवनातही उतरत नाही. त्यामुळे जे चांगले ऐकाल, ते प्रत्यक्षात आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा.
लायन्सने मोठी कार्ये हाती घ्यावीत
By admin | Updated: December 22, 2014 00:05 IST