शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संवादातून उलगडली नाटककाराची जीवनसंहिता

By admin | Updated: September 15, 2014 00:57 IST

औरंगाबाद : शाळेत असताना पानशेतच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या नाट्यमहोत्सवात सांभाळलेला कपडेपट ते ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ सारख्या आशयघन नाटकांचे लेखन- दिग्दर्शन...

औरंगाबाद : शाळेत असताना पानशेतच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या नाट्यमहोत्सवात सांभाळलेला कपडेपट ते ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ सारख्या आशयघन नाटकांचे लेखन- दिग्दर्शन.... महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकताना जिंकलेला पुरुषोत्तम करंडक ते ’पद्मश्री’ चा बहुमान.... तारुण्यसुलभ कुतूहलातून रंगमंचावर ठेवलेले पाऊल ते आजघडीला नाट्य वर्तुळात कोरलेली स्वतंत्र ओळख.... ख्यातकीर्त नाटककार डॉ. सतीश आळेकर यांनी स्वत:सह मराठी नाटकाचाही प्रवास चित्रमय शैलीत उलगडला. साहित्य अकादमी आणि मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात डॉ. आळेकर यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.यावेळी साहित्य अकादमीचे कृष्णा किंबहुने, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह कुंडलिक अतकरे उपस्थित होते. डॉ. आळेकर म्हणाले, घरात सतत नाटकाच्या चर्चा सुरू असायच्या. आई-वडील रंगायन, पृथ्वी थिएटरची नाटके पाहायचे. साधनेच्या कलापथकातील कलाकारांचाही घरात वावर असायचा. शालेय काळात नाटकांमध्ये काम केले नाही. मात्र, महाविद्यालयात असताना अपघातानेच एका नाटकात बदली भूमिका केली. पुढे एम. एस्सी. ला असताना लिहिलेली ‘झुलता पूल’ ही एकांकिका स्पर्धेत कमालीची गाजली. या काळातच डॉ. जब्बार पटेल यांच्याशी स्नेह जुळला. अनेक समविचारी सहकारी मिळाले. त्यातून लेखनासह जीवनविषयक भूमिकाही पक्क्या होत गेल्या. लेखक व व्यक्ती म्हणूनही माझा कल कायम डावाच राहिलेला आहे.