शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
4
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
5
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
6
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
8
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
9
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
10
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
11
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
12
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
13
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
14
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
15
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
16
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
17
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
18
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
19
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
20
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...

शेतकऱ्यांच्या तोंडाला केंद्राने पाने पुसली

By admin | Updated: September 6, 2014 00:26 IST

हिंगोली : ‘माय वाढेना अन् बाप खाऊ देईना’ अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था संपण्याच्या मार्गावर नाही.

हिंगोली : ‘माय वाढेना अन् बाप खाऊ देईना’ अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था संपण्याच्या मार्गावर नाही. यंदाही त्याची प्रचिती अधिकच येणार असल्याचे नुकतेच केंद्र शासनाकडून एमएसपीने जाहीर केलेल्या हमीभावावरून दिसून येते. मूग, हरभरा आणि सुर्यफूल वगळता एकाही पिकांचे दर ५० रूपयांच्या पुढे वाढले नसल्याने भाजपाचे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यात हिंगोली बाजार समितीत वर्षभर हरभरा हमीपेक्षा कमी दराने विकला गेल्याने शेतकऱ्यांना कोणी वाली नसल्यासारखी अवस्था झाली आहे. नवीन सरकारने अपेक्षा वाढवून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे हमीभावाकडे डोळे लागले होते. नुकताच केंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताच शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. खरीप, रबी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामातील तीन पिके वगळता सर्व पिकांच्या दरात ५० रूपयांच्या पुढे वाढ झालेली नाही. हरभरा, मूगाच्या दरात १०० आणि सूर्यफुलात २०० रूपयांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली. उर्वरित एकाही पिकांच्या दरात उल्लेखनीय वाढ झालेली नाही. परिणामी यंदाच्या विपरित परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता वाटते. कारण २ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आणि ८६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. साडेचारपैकी तीन लाख हेक्टरवर पेरणी झालेल्या नगदी पिकांच्या दरांत केवळ ५० रूपयांची वाढ केली. गतवर्षी सोयाबीनचे २२० तर कापसाच्या दरात १०० रूपयांची वाढ केली होती. यंदा सुर्यफूल २००, हरभरा आणि मुगात १०० रूपयांची वृद्धी केली; परंतु या तिन्हीही पिकांचे मिळून जिल्ह्यात ९ हजार ३१३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. परिणामी वाढलेल्या दराचा फायदा कास्तकारांना होणार नाही. दुसरीकडे याच दरापेक्षा कमी दराने खरेदी होण्याचे प्रकार हिंगोली बाजार समितीत गतवर्षी घडले. वर्षभर हरभऱ्याची खरेदी हमीपेक्षा ३०० रूपयांच्या कमी दरावर केली. तरीही समिती आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने याकडे कानाडोळा केला. यंदाही त्याची प्रचिती आली तर डोक्यावर हात मारण्याची वेळ उत्पादकांवर येईल. खरीप, रबी पिकांच्या आधारभूत किमतीपिके २०११-१२ १२-१३ १३-१४ १४-१५भात सामान्य दर्जा १०८० १२५०१३१०१३६०भात अ दर्जा १११० १२८०१३४५१४००ज्वारी हायब्रीड९८०१५००१५००१५३०ज्वारी मालदांडी१०००१५२०१५२०१५५०बाजरी ९८० ११७५१२५०१२५०नाचनी १०५० १५००१५००१५५०मका९८० ११७५१३१०१३१० तूर ३२०० ३८५०४३००४३५०मूग ३५०० ४४००४५००४६००उडीद ३३०० ४३००४३००४३५०भूईमूग २७००३७००४०००४०००काळे सोयाबीन१६५०२२००२५००२५००पिवळे सोयाबीन१६९०२२४०२५६०२५६०तीळ३४००४२००४५००४६००मध्यम धागा कापूस२८००३६००३७००३७५०लांब धाका कापूस३३००३९००४०००४०५०गहू११२०१२८५१३५०१४००हरभरा२१००२८००३०००३१००मसूर२२५०२८००२९००२९५०मोहरी १८५०२५००३०००३०५०सूर्यफूल१८००२५००२८००३०००साखर१४५१७०२१०२२०