विठ्ठल कटके , रेणापूरस्व़ विलासराव देशमुख व भाजपाचे नेते स्व़ गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांचे रेणापूर तालुक्यावर विशेष लक्ष होते़ या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असल्याने या दिग्गज नेत्यांची वारंवार उमेदवार व मतदारांना उणिव भासत आहे़ त्यामुळे ‘हे दोन नेते असते तऱ़़’ असे उद्गार निघत असून, तालुक्यात १३ उमेदवार रिंगणात असले तरी आघडीला खरी लढत दुरंगीच होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे अॅड़ त्रिंबक भिसे, भाजपातर्फे रमेशअप्पा कराड, राष्ट्रवादीतर्फे आशाताई भिसे, मनसेचे संतोष नागरगोजे, शिवसेनेचे हरिभाऊ साबदे हे पक्षाच्या अधिकृत चिन्हांवर निवडणूक लढवीत आहेत़ तसेच दत्ता कोल्हे, सुनील क्षीरसागर, अंकुश जाधव, व्यंकटेश कसबे, बालाजी केंद्रे, पांडूरंग भंडारे, मोबीन सय्यद, गणेश गोमसाळे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ सद्य:स्थितीला काँग्रेस आणि भाजपा अशी दुरंगी लढत होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजप वगळता अन्य पक्षाचा उमेदवार कोण राहिल़़ याची निश्चिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत स्पष्ट नव्हती़ त्यामुळे कार्यकर्त्यांतही संभ्रमाचे वातावरण होते़ दरम्यान, भाजपाचे रमेशअप्पा कराड यांनी गेल्या काही दिवसापासून प्रचाराला सुरूवात केली होती़ प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडून मतदारांच्या भेटीगाठी, कॉर्नर बैठका घेण्यास सुरुवात केली़ तसेच पदयात्रा काढण्यात येत आहेत़ गत निवडणुकीत काँग्रेसचे वैैजनाथ शिंदे व रमेशअप्पा यांच्यात सरळ लढत झाली होती़
दिग्गज नेत्यांची भासतेय् उणिव
By admin | Updated: October 9, 2014 00:38 IST