जालना : शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरुच असून येथील देऊळगावराजा रोडवरील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेतीन तोळे दागिने व रोख ४० हजार असा ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सोमवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.देऊळगावराजा रोडवरील बक्कलगुडा भागातील व्यापारी मोहन शंकरलाल भगत (वय ६८) हे आपल्या कुटुंबियांसह ७ फेबु्रवारी रोजी देवदर्शनासाठी गेले. ९ फेबु्रवारी रोजी घरी परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.भगत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील कालावधीत चोरट्यांनी गच्चीवरून मजल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील दागिने व रोख रक्कम लंपास केली. या तक्रारीनंतर पोलिस उपनिरीक्षक परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती ठाणे अंमलदार बारोटे यांनी दिली.
साडेतीन तोळे दागिने लंपास
By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST