गजानन वानखडे ,जालनासाक्षर भारत निर्माण अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात प्रौढ नागरिकांना साक्षर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या १५८३ प्रेरक-प्रेरिकांचे मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.प्रौढ साक्षर निरंतर विभागाअंतर्गत जिल्ह्यातील १८ ते ३५ या वयोगटातील जे महिला पुरूष निरक्षर आहेत. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, अशा नागरिकांना शिक्षण देण्यासाठी साक्षर भारत अभियानाची सुरूवात झाली. परंतु या अभियानातील प्रेरक-प्रेरिकांना दोन वर्षांपासून मानधनच देण्यात आले नाही. त्यामुळे या अभियानावरही त्याचा परिणाम झाला. प्रेरक-प्रेरिका तुटपुंज्या २००० हजार रुपयांच्या मानधनावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांची उपासमार होत आहे. या प्रेरक-प्रेरिकांचे शिक्षण एम.ए. बीएड, डीएड, बारावीपर्यंत झालेले आहे. मात्र आज त्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.गेल्या दोन वर्षापासून जिल्हयातील सर्वच पे्ररक - प्रेरिकांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे अनेकांचे संसार कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. अधिकारी वर्गाच्या दिरंगाईमुळे आम्हाला वेळेवर मानधन मिळत नसल्याची खंत पे्ररक प्रेरिका संघटनेचे अध्यक्ष समाधान खरात यांनी व्यक्त केली. - समाधान खरात, अध्यक्ष४साक्षर भारत अभियानाअंर्गत होणाऱ्या विविध कामासाठी केंद्र शासनाकडून दहा जिल्ह्यांसाठी ४५ कोटी रूपयांचा निधी आलेला आहे. त्यात मराठवाडयातील आठ, विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि खान्देशमधील नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्याला या निधीतून तात्काळ पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्याच्या कोषागारात पैसे जमा झाले आहेत. ज्यांची कामे पूर्ण झाली आहेत अशा प्रेरक - प्रेरिकांचे तात्काळ मानधन देण्याच्या सुचना संबधीत विभागाला देण्यात आल्या आहे.- नंदन नांगरे, संचालक
गेल्या दोन वर्षापासून प्रेरकांना मानधन मिळेना
By admin | Updated: January 22, 2015 00:42 IST