शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

लाखो भाविक नाथचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:15 IST

नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारकºयांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान बुधवारी ५ लाखांवर भाविक व वारकºयांनी नाथांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे यांनी सांगितले. महाराष्ट्रभरातून ५३७ दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्याची नोंद न.प.कडे झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वारकºयांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले. यंदा दिंडीसोबत वारकºयांची संख्या कमी असली तरी वाहनाने येणाºया वारकºयांच्या संख्येत मोठी वाढ झाली.बोंडअळी व गारपिटीमुळे यंदा भाविकांची संख्या कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता; परंतु नाथांवर असलेली अपार श्रद्धा वारकºयांना रोखू शकली नाही. षष्ठीपूर्व नगर परिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केल्याने व शहरात दाखल होणाºया रस्त्यांची कामे झाल्याने वारकºयांना सुटसुटीत रस्ते उपलब्ध झाले व वाहतूकही जाम झाली नाही.स्वयंसेवी संस्थांचे कार्यवारकरी व भाविकांना सेवा व सुविधा पुरवून प्रशासनास मदत होईल, असे महत्त्वपूर्ण काम विविध स्वयंसेवी संस्था करीत आहेत, त्यात मंदिर परिसरात दर्शन व्यवस्थेत सहकार्य करण्यासाठी ३२५ स्वयंसेवकांसह अनिरुद्ध अकॅडमी, यांच्यासह रामकृष्ण मिशन आश्रमचा मेडिकल कँप, स्वकाम सेवा मंडळाची स्वच्छता, जय बजरंग संघ, सावन कृपाल रुहानी मिशन, ज्येष्ठ नागरिक संघ, पाथर्डी, संत एकनाथ सेवा संघ, रेड स्वस्तिक व शांतिब्रह्म संत एकनाथ वारकरी सेवा प्रतिष्ठान यांचा समावेश आहे.धरणाच्या पिचिंगवर वारकरीनाथषष्ठीसाठी पैठणनगरीत आलेल्या वारकºयांनी स्नानासाठी आज पहाटेपासून थेट जायकवाडी धरणाकडे मोर्चा वळवला व लाखो भाविकांनी धरणाच्या काठावर बसून गोदावरीच्या पवित्र स्नानाचे पुण्य प्राप्त केले.च्जायकवाडी धरणाकडे जाणारा उद्यान रोड आज पहाटेपासून खचाखच भरलेला होता. लाखोंच्या संख्येने वारकरी स्नानासाठी या मार्गाने जात असल्याने अनेक वेळा हा मार्ग जाम होत होता. धरणाच्या पिचिंगवर दगडाऐवजी वारकरी दिसत होते. वारकºयांच्या उपस्थितीने जायकवाडीचा काठ फुलून गेला होता. पहाटे-पहाटे धरणाच्या काठावरून होणारा ‘भानदास एकनाथ’चा जयघोष मनाला प्रफुल्लित करून जात होता.धरणावर पोहणाºया तरुणांचे सुरक्षा पथकजायकवाडी धरणावर दुर्घटना होऊ नये म्हणून नगर परिषदेतर्फे अंतराअंतराने पोहणाºया तरुणांचे बचाव पथक तैनात करण्यात आले होते. पहाटे नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, माजी नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड, सतीश पल्लोड, दिलीप मगर, सुनील रासणे, व्यंकटी पापूलवार आदींनी जायकवाडी धरणावर जाऊन सुरक्षा पथकास काळजी घेण्याबाबत सूचना केल्या.विजयी पांडुरंगास अभिषेकआज फाल्गुन वद्य षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालण्यात आले व विधिवत पूजा करून पुन्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याचवेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीची सुद्धा विधिवत पूजा करण्यात आली.गोदापात्रात सोडले पाणीजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये नाथषष्ठीनिमित्त वारकरी व भाविकांना स्नानासाठी जायकवाडी धरणातून बुधवारी गोदापात्रात १०० क्युसेक्स दराने पाणी सोडण्यात आले. तीन दिवस पाण्याचा विसर्ग चालू राहणार असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.विश्वशांतीसाठी अनोखे पसायदाननाथषष्ठीनिमित्त ७ मार्च रोजी महाराष्ट्रातील पहिलाच आगळावेगळा विश्वशांती प्रार्थना संदेश पसायदान उपक्रम येथे लाखो वारकरी व भक्तांनी राबविला. जवळ्पास ५५० दिंड्यांमधून एकाचवेळी भक्तीमय वातावरणात पसायदान गाऊन जगाला विश्वशांतीचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमाचे संत -महंत व वारकºयांनी स्वागत करुन महाराष्ट्रात भरणाºया यात्रेत हा संदेश राबविला जाईल, असा निर्धार वारकरी संघटनेने जाहीर केला.या उपक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. चंद्रकांत भराट, आ. संदीपान भुमरे, ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता मंदिरसमोरील माऊली संस्थान फडावर लाखोच्या जनसमुदायाने ठरल्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता विश्वशांतीसाठी एकाचवेळी प्रार्थना केली. या कार्यक्रमास ह.भ.प. चंद्रकांत महाराज बांडे, कल्याण महाराज तांबे, कल्याण वीर, बाळू महाराज, काशिनाथ महाराज माने, विठ्ठल महाराज संपाते, दादा बारे, सोमनाथ टाक, चव्हाण, नीलेश देशमुख, गोरडे, सुमित औटे, विवेक दौंड आदी उपस्थित होते.