जालना : जालना ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस ९ आॅगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे यांनी केली होती. मात्र, या संदर्भातील कुठलेही आदेश जालना रेल्वे प्रशासनाकडे आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दानवे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. त्यानंतर प्रभु यांनी ही सेवा सुरू करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिल्याचे खा. दानवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. क्रांतीदिनापासून जालना येथून धावणार असून, ९ आॅगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजता खा. रावसाहेब दानवे हे या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविणार आहेत. ही रेल्वे दुपारी साडेबारा वाजता मुंबईत पोहोचणार आहे. याच रेल्वेने त्यांच्यासह लोकप्रतिनिधी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील आदी प्रवास करणार आहेत. १० आॅगस्टला जालना जिल्ह्याच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दानवे यांच्यासह शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचे खा. दानवे यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
क्रांतीदिनीच धावणार जनशताब्दी-दानवे
By admin | Updated: August 7, 2015 01:13 IST