लातूर : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व दिंडोरी प्रणित मार्गाचे पीठाधीश प़पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सत्संग मेळाव्यास लाखो भाविकांचा रविवारी जनसागर उसळला. यामुळे क्रीडा संकुलावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले. अध्यात्मिक विचारांबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत नवीन कृषी धोरण राबविण्याची गरज गुरुमाऊलींनी व्यक्त केली. लातूर येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्या वतीने रविवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित सत्संग मेळाव्यास माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार अॅड. त्रिंबक भिसे, शिक्षक आ. विक्रम काळे, महापौर अख्तर मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे म्हणाले, मातीचे महत्व ओळखून काळ्या आईचा आदर करा आणि कृषी विभागाशी संबंधित सर्व जणांनी एकत्र येऊन जनजागृती करावी. जेणेकरून आत्महत्या रोखल्या जातील.
गुरू माऊलींच्या सत्संगाला उसळला जनसागर
By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST