शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जागाच न सोडल्याने रोहित्र रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:50 IST

हिंगोली : पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीकडून शहरातील जवळपास सर्व विद्युत रोहित्रांची दुरुस्ती केल्यानंतरही ‘जैसे थे’ परिस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर अगदी रस्त्यावरच असणाºया डीपी या पालिका, नगररचना विभाग लेआऊटमध्ये जागा सोडत नसल्याची देण असल्याचे महावितरण सांगते. तर दुसरीकडे महावितरण मात्र अशी रोहित्रे उंचीवर लावण्याऐवजी लहान मुलांचा हात पुरेल, एवढ्या उंचीवर लावते. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा सामूहिक खेळ खेळला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीकडून शहरातील जवळपास सर्व विद्युत रोहित्रांची दुरुस्ती केल्यानंतरही ‘जैसे थे’ परिस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर अगदी रस्त्यावरच असणाºया डीपी या पालिका, नगररचना विभाग लेआऊटमध्ये जागा सोडत नसल्याची देण असल्याचे महावितरण सांगते. तर दुसरीकडे महावितरण मात्र अशी रोहित्रे उंचीवर लावण्याऐवजी लहान मुलांचा हात पुरेल, एवढ्या उंचीवर लावते. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा सामूहिक खेळ खेळला जात आहे.हिंगोलीत रोहित्रे ही धोक्याची ठिकाणे बनली आहेत. अगदी रस्त्यावरच त्यांचे ठाण. वसाहती वाढतात. मात्र अशा वसाहतींच्या वीजव्यवस्थेकडे नगररचना विभाग, नगरपालिका कोणीच लक्ष देत नाही. नगररचना विभागाचा कारभार तर डोळे मिटून दूध पिणाºया मांजरासारखा आहे. मात्र त्याबाबत कोणी बोलत नाही. जिल्हा प्रशासनही त्यात फारसा हस्तक्षेप करीत नाही. तसेच दिलेले लेआऊट अन् त्यात परस्पर झालेले बदल ते कधीच पाहात नाहीत. ती जबाबदारीही नसल्याचे सांगितले जाते. मग डीपीसाठी स्वतंत्र जागा ठेवण्याकडे लक्ष देणे अख्ख्या गावाचा कारभार पालिकेला तर शक्यच नाही. मोकळ्या जागेत प्लॉटींग करतेवेळी रोहित्र कुठे बसवले जावे? याचे नियोजन नसते, शिवाय नवीन वसाहतीमध्ये रस्त्यांची कामे केलेली नसतात. त्यामुळे विद्युत रोहित्र उपलब्ध व सोयीच्या ठिकाणी बसविण्यात येते. परंतु नंतर रोहित्र रस्त्यालगतच येते.याबाबत पालिका व महावितरणची नुकतीच एक बैठक झाली. त्यात मोकळ्या ठिकाणी रोहित्रांसाठी स्वतंत्र जागा असावी या विषयावर सखोल चर्चा झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. परंतु शहरातील अनेक जुन्या वसाहतींसह नव्याने बसविलेल्या रोहित्रांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक प्रभागात तर जमिनीलगत रोहित्र आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी वारंवार वीज दुर्घटनेच्या घटना घडतात. आठ दिवसांपूर्वीच अशाच एका धोकादायक रोहित्राने चिमुकल्याचा बळी घेतला. त्यामुळे महावितरणचे पावसाळपूर्व तयारीचे सोंग जगजाहिर झाले. यामुळेच सध्या शहरातील धोकादायक रोहित्रांचे सर्वेक्षण करण्यात आले. जे की सदर कामे पावसाळा अगोदरच होणे गरजेचे होते.ग्रामीण भागात उघड्या वीज रोहित्रातून विजेचा धक्का बसून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनांचे अनेक उदाहरणे देता येतील. वीजसमस्यांचे प्रश्न तत्काळ सोडविली जात नसल्याने दुर्घटनांच्या घटनेत वाढ होत चालली आहे.