शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली बस

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

बाळासाहेब जाधव , लातूर प्रवाशांना सुखकर व सुरक्षीत प्रवासाची हमी देणारी एसटीची सेवा ६८ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर इंदरठाण्यात येत्या दोन दिवसात पोहोचणार

बाळासाहेब जाधव , लातूरप्रवाशांना सुखकर व सुरक्षीत प्रवासाची हमी देणारी एसटीची सेवा ६८ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर इंदरठाण्यात येत्या दोन दिवसात पोहोचणार असल्याने एसटीच्या स्वागतासाठी इंदरठाणा, सांगवी, आरजखेडा, दर्जीबोरगाव या गावातील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत़‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याने सेवा देणारी लातूरची एसटी वर्षभरातील उत्पन्नात राज्यात प्रथम क्रमांकावर आली आहे़ तरीही लातूर जिल्ह्यातील बऱ्याच गावात स्वातंत्र्याला ६८ वर्षे पूर्ण झाले असतानाही बऱ्याच गावात अजूनही एसटी जात नाही़ परिणामी जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी या भागातील प्रवाशांना एक ते दीड किलोमीटरचा नागझरी पर्यंतचा प्रवास करावा लागत आहे़ अशी अवस्था रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा गावाचीही झाली होती. त्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी गावात एसटी सुरु व्हावी, यासाठी त्यांनी लातूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे निवेदनही दिले होते़ परंतु, या गावाकडे जाणारा रस्ताच चांगला नसल्याने बसची सोय करणे शक्य नव्हते़ परिणामी इंद्रठाणा या गावातील नागरिकांना लातूरला ये- जा करण्यासाठी नागझरीपर्यंत एक-दीड किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत होता़ परिणामी, शालेय विद्यार्थ्यासह वृध्दांचीही गैरसोय होत होती. ही दूरदृष्टीता लक्षात घेऊन इंदरठाण्याचे सरपंच रौफ पटेल, जफर पटेल, प्रशांत स्वामी, बलभीम घोडके, सांगवीचे सरपंच भीमाशंकर जाधव, डॉ़नितीन भराटे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या मार्गावरील मांजरा नदीवरील पुलाचे व रस्त्याचेही काम मार्गी लागले. त्यामुळे गावात आता तरी एसटी सुरू होणार, अशी अपेक्षा गावातील लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांनाही वाटत होती़ परंतु, एसटी कधी सुरु होणार हा दिवस माहीत नव्हता. परंतु विभाग नियंत्रक डी़बी़ माने यांच्या दूरदृष्टीतून ६८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर इंदरठाणेकरांना बुधवारी बसने प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे़