शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

कोट्यवधींची गुंतवणूक; लाखोंना मिळणार रोजगार

By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद केंद्र शासनाने औरंगाबादसाठी इलेक्ट्रॉनिक हबची घोषणा केल्याने औद्योगिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

मुजीब देवणीकर , औरंगाबादकेंद्र शासनाने औरंगाबादसाठी इलेक्ट्रॉनिक हबची घोषणा केल्याने औद्योगिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. इलेक्ट्रॉनिक हब दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा (डीएमआयसी) एक भाग असणार आहे. हबमध्ये इलेक्ट्रॉनिक कंपन्या उभारणाऱ्या उद्योजकांना विविध सुविधा, सवलतीही देण्यात येणार आहेत. मोठ्या कंपन्या कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतील, त्यांच्यासोबत काही व्हेंडरही येतील. बेरोजगारांना रोजगारांच्या संधीही प्राप्त होणार आहेत. ही सर्व प्रक्रिया औद्योगिक विकासाला गती देणारी ठरेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.दोन हजार कोटींचा बिझनेसव्हिडिओकॉन ही सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कंपनी शहरात आहे. या कंपनीला माल पुरवठा करणारे अनेक छोटे उद्योजक आहेत. याशिवाय औरंगाबाद इलेक्ट्रिक ग्रुप, सिमेन्स, क्रॉम्प्टन ग्रिव्हजसह अ‍ॅटोमेशन क्षेत्रातील १७-१८ कंपन्या शहरात आहेत. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल सुमारे दोन हजार कोटी आहे. इलेक्ट्रॉनिक हबमुळे हा आकडा कितीतरी पट वाढू शकतो.सीईडीटी सेंटर औरंगाबादेतसेंटर फॉर इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (सीईडीटी) ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स जगताला मनुष्यबळ पुरवत असते. या संस्थेचे केंद्र विद्यापीठ परिसरातच आहे. भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स हबला लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविणारी संस्थाच शहरात असल्याने येणाऱ्या उद्योजकांना फारसा त्रास सहन करावा लागणार नाही.जबाबदारी वाढणार1औरंगाबादेत इलेक्ट्रॉनिक हब उभारणार ही आनंदाची बाब आहे. शहरात इलेक्ट्रॉनिक बेस खूपच मजबूत आहे. आॅटोमोटिव्हनंतर नवीन इलेक्ट्रॉनिक हब आल्यास जबाबदारी वाढणार आहे. कारण छोट्या उद्योजकांसाठी क्लस्टर तयार करून द्यावा लागेल. औद्योगिक संघटनांना यासाठी पाठपुरावा करावा लागेल. सीएमआयएचा एक स्वतंत्र सेल यासाठी काम करीत आहे. अ‍ॅटोमेशनमध्ये काम करणारे अनेक लोक शहरात आहेत. त्यांनाही हबचा फायदा होईल, असे सीएमआयचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.2कच्च्या तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारला जेवढा खर्च करावा लागतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आयातीवर करावा लागतो. भारतीय अर्थव्यवस्थेला मारक ठरणारी ही प्रक्रिया ब्रेक व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने देशभरातील आठ शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औरंगाबादचाही समावेश असून, हबमुळे शहराच्या औद्योगिक विकासाला गती मिळेल, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाखो बेरोजगारांना रोजगार मिळेल.राज्यात तीन हब1२०२० मध्ये भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या आयातीवर वार्षिक ३०० अरब डॉलर खर्च करावे लागतील. कच्च्या तेलापेक्षाही ही परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे केंद्राने भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.2 महाराष्ट्रात नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स हब उभारण्यात येणार आहे.दीड वर्षापूर्वीच चाचपणी1देशात इलेक्ट्रॉनिक हब आणि क्लस्टर उभारण्याची योजना दीड वर्षापूर्वी यूपीए सरकारने सुरू केली होती. काही कारणांमुळे ही योजना पूर्ण झाली नव्हती. या योजनेला गती देण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने सुरू केले आहे. दीड वर्षापूर्वी प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली एक पथक औरंगाबादेत आले होते.2या पथकाने इलेक्ट्रॉनिक हबसंदर्भात चाचपणी केली होती. पथकासमोर सीएमआयए या औद्योगिक संघटनेने एक सुंदर प्रेझेंटेशन सादर केले होते. इलेक्ट्रॉनिक हबसाठी औरंगाबादेत कशा पद्धतीने पोषक वातावरण आहे, याची माहिती देण्यात आली होती.