औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी ३१ कोरोना रुग्णांची भर पडली आणि २६ जण कोरोनामुक्त झाले, तर उपचार सुरू असताना अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ७२ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ७२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३१ रुग्णांत मनपा हद्दीतील २८, ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १५ आणि ग्रामीण भागातील ११, अशा एकूण २६ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. जालना जिल्ह्यातील ५४ वर्षीय महिला कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
भावसिंगपुरा १, पद्मपाणी कॉलनी १, घाटी परिसर १,चिकलठाणा १, एन चार सिडको १, सातारा परिसर २, राम नगर १, एन नऊ एम दोन १, शीतल अपार्टमेंट गारखेडा २, आरेफ कॉलनी १, आनंद नगर, बीड बायपास ३, एमआयटी कोविड केअर सेंटर १, रेल्वे स्टेशन परिसर १, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी ५, एन पाच सिडको १, अन्य ५
ग्रामीण भागातील रूग्ण
कडेठाण, पैठण १, गल्लेबोरगाव, खुलताबाद १, वरूड १