शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन जोरात

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

नांदेड : जिल्हाभरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन राजरोसपणे सुरु आहे़ 'हप्तेखोरी' च्या पायावर उभा असलेला हा जुगार त्यामुळे दिवसेंदिवस भरभराटीलाच येत आहे़

नांदेड : जिल्हाभरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन राजरोसपणे सुरु आहे़ 'हप्तेखोरी' च्या पायावर उभा असलेला हा जुगार त्यामुळे दिवसेंदिवस भरभराटीलाच येत आहे़ त्यामुळे अख्खी तरुण पिढी जुगाराच्या आहारी गेली आहे़यापूर्वीचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात अवैध धंद्यांना आवर घालण्यात पोलिसांना बऱ्याच प्रमाणात यश आले होते़ त्यांच्यानंतर मात्र जिल्ह्यातील अवैध धंद्याना ऊतच आला़ कुणाचा पायपोस कुणाला नाही़ अशीच एकंदर परिस्थिती निर्माण झाली़ त्यामुळे पूर्वी फक्त काही भागापुरता मर्यादित असलेला हा जुगार आजघडीला जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी खुलेआम सुरु आहे़ कारवाईचा कोरम पूर्ण करण्यासाठीच पोलिसांकडून एखाद्यावर थातूर-मातूर कारवाई करण्याचे सोपस्कार केले जातात़ त्यातही पोलिस आणि मटका बुकींचे असलेले संबध सर्वश्रृत असल्याने या बिनभांडवली धंद्याचा विळखा वाढतच चालला आहे़ जिल्ह्यातील काही मोजक्या भागाचा हा घेतलेला आढावा़ (प्रतिनिधी)मुखेड तालुक्यात दररोज लाखोंची उलाढालमुखेड : तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षाने मटका नावाचा जुगार खुलेआम सुरु आहे़ या जुगारातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे़मुखेड शहरासह सावरगाव (पि़), दापका राजा, हिपरगा, कामजळगा, जांब, चांडोळा, बेटमोगरा, सलगरा, बाऱ्हाळी, एकलारा, येवती, जाहूर, आंबुलगा, राजुरा, मुक्रमाबाद, दापका गुंडोपंत, रावी यासह गावागावात मटका नावाचा जुगार खेळला जात असून ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये चिठ्ठयावर तर लहान गावात मोबाईलवर मटक्याचे आकडे खेळले जात आहे़ मुखेड शहरात याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे़ शहरातील तलाईगुडा, बाऱ्हाळी नाका, विरभद्र मंदिर परिसर, बसस्थानक, जि़प़हा़ मुलींचे व मुलांची शाळा परिसर, फुलेनगरमधील पानटपरी व हॉटेलमधून कल्याण व मुंबई या नावाचा मटका जुगार घेतला जातो़ प्रत्येक मटक्याच्या बुकीवर हे अंक मटका खेळणाऱ्यांच्या हातात दिसून येत आहे़ या जुगारात नशीब आजमावणाऱ्यांना एका रुपयास ९० रुपये दिले जातात, दोन आकड्यांसाठी ९० रुपये तर तीन आकड्यांसाठी १०० रुपये दिले जाते़ या मटका नावाच्या जुगार खेळणाऱ्यात मोलमजुरी करणारे, कोरे व्यवसाय करणाऱ्यांसह युवकाचे प्रमाण जास्तीचे आहे़ मटका खेळणाऱ्यांचे कुटुंब अडचणीत येत आहेत़ (वार्ताहर) शिरड, येळंब, कोळी येथे मोबाईल मटका़़़निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या शिरड, येळंब, कोळी येथे मोबाईल मटका जोमात आहे़ कमी पैसा व वेळेत झटपट श्रीमंत होण्यासाठी अबालवृद्ध मटका जुगाराकडे आकर्षित अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत़मोबाईलवरच मटक्याचे आकडे एजंट घेत असून अनेकांची उसनवारीही सुरु आहे़ मटक्याचा आकडा येण्याच्या वेळेला मोबाईलवर कोणता आकडा आला म्हणून एजंटचा मोबाईल व्यस्त असतो़ तर शिरड येथे एक एजंट स्वत:च मटक्याचा व्यवसाय करतो़ मटका जुगारच्या आकडे लावलेल्या चिठ्ठया मिळत नसल्याने पोलिसही हतबल आहेत़ सर्व व्यवहार मोबाईल व वहीच्या पानावर राहतो़ आज कोणता आकडा येईल म्हणून मटके बहाद्दर एखादे वृत्तपत्र घेवून आकड्याचे गणित लावून आज हा आकडा येणारच म्हणून दावा करून आपल्या बरोबर दुसऱ्यालाही हा आकडा लाव, उद्या येणारच म्हणून सांगत असतो़ मटका खेळणाऱ्यांची संख्या वाढत आहे़ यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत़ (वार्ताहर) अंदाज काढणाऱ्या प्रोफेसरांचीही चलती़़़मटक्याच्या आकड्यांचे अंदाज काढण्यासाठी शहरात काही जाणकार आहेत़ त्यांना 'प्रोफेसर' या नावाने ओळखल्या जाते़ नजिकच्या तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रोफेसरला येथे जास्त मोबदला दिला जातो़ शहरातील इस्लामपूरा भागातील एका दुमजली इमारतीत सर्व लक्झरी सुविधेसह हा मटका व्यावसायिक स्वरूप घेत आहे़ आजवर येथे या मटका चालकांविरूद्ध मोजक्या कारवाया झाल्या़ त्या फक्त नांदेडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केल्या़ मात्र त्या सर्व जुजबी ठरल्या़४ उमरीत स्थानिक २५ एजंट असून दररोज या एजंटांकडे हजारो रुपयांचा मटका खेळला जाता़े़ दररोज तीन लाख रुपयांचा मटका येथे खेळला जातो़ उमरीत 'मुंबई-कल्याण'चा बोलबालाउमरी : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे मुंबई-कल्याण नावाचा मटका जुगार जोरात चालू असून स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने चालणारा हा व्यवसाय आता वैध होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे़उमरी शहरातील बसस्थानक भागातून या मटका जुगाराची सूत्रे हलविली जातात़ शहरात मोंढा भाग, मच्छी मार्केट या भागातून पायी फिरून एजंटद्वारे आकड्यांची नोंदणी केली जाते़ दुपारी ३ वाजता त्यानंतर सायंकाळी ६ वाजता तसेच क्लोजचा शेवटचा आकडा रात्री ११ वाजता येतो़ ही सर्व माहिती मुंबई व कल्याण येथून मोबाईलवरून मिळते़ उमरी शहरात या मटक्याची नोंद इतर ठिकाणाहूनही घेतली जाते़ यात मुदखेड, नांदेड, धर्माबाद, करखेली, निजामाबाद, म्हैसा येथून एजंटामार्फत मोठ्या प्रमाणात आकड्यांची नोंद घेतली जाते़ श्रमाविना व झटपट पैसा मिळविण्याच्या आशेने गरीब मजूर, हमाल, शेतकरी आदी अनेक क्षेत्रातील लोक या जुगाराकडे आकर्षित झाले़ रविवार या सुटीच्या दिवशी मटका बंद असतो़या दिवशी मुख्य मटका चालकातार्फे एजंटाला व दररोजच्या बड्या ग्राहकाला खुश करण्यासाठी ओली पार्टी दिली जाते़ त्यामुळे हा धंदा अधिकच भरभराटीस आला़ विशेष म्हणजे या जुगाराम उच्चवर्णीय व्यापारी, शिक्षक व अधिकारी कर्मचारी सुद्ध मोठ्या प्रमाणात गुंतल्याचे सांगण्यात येते़जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुपारी धाड टाकून तिघांविरूद्ध कारवाई केली़ यात मुख्य मटकाचालक बाबुबेग हुसेनबेग, परवेज बेग महेबुबबुग व शेख जलील या तिघांना पकडले़ २ हजार रुपये रोख व मटक्याच्या चिठ्ठया जप्त करण्यात आल्या़ यापूर्वी धरमसिंग चव्हाण हे उमरीला पोलिस उपनिरीक्षक असताना त्यांनी मटका चालकांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला होता़ यात बाबूबेगला हातकडीसह नांदेडला पोलिस अधीक्षकांकडे पाचारण केले होते़ तरीही या धंद्याच्या उलाढालीत फरक पडला नाही़ उलट आता हा गोरखधंदा वैध ठरत असल्याचा देखावा तयार करण्यात येतो़ कारण कमी होण्याऐवजी जुगार चालक शिरजोर बनून हा धंदा चालवित असल्याचे दिसत आहे़ (वार्ताहर)