औरंगाबाद : ‘शायर मिर्झा गालिब यांच्यावर खूप कर्ज होतं. मला शक्य असतं ना; तर मी ते फेडलं असतं; पण आजघडीला मीच या कलंदर कवीचा कर्जदार होऊन बसलो आहे आणि येणारी प्रत्येक पिढी त्याच्या ऋणात असणार आहे यात शंका नाही.’ प्रसन्न गौरवर्ण, कायमची ओळख बनलेला शुभ्र कुर्ता, पायजामा, वयाच्या सुरकुत्या ओलांडत डोळ्यात झळाळणारी मिश्किली आणि अवघ्या आयुष्याचा समजूतदार स्वीकार करणारी सौम्य-स्निग्ध मुद्रा... मूर्तिमंत कविपण साकारत गुलजार नावाचा अवलिया बोलू लागला तेव्हा ‘गुलजार बोलतो त्याची कविता होते’ या उक्तीचा प्रत्यय रसिकांनी घेतला. प्रख्यात शायर, गीतकार आणि कथाकार गुलजार यांच्या मिर्झा गालिब या पुस्तकाच्या अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन रविवारी साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.
‘मी तर शायर मिर्झा गालिबचा कर्जदार!’
By admin | Updated: December 22, 2014 01:20 IST