नांदेड : संपूर्ण मानवांचे कल्याण साधणे हा बुद्धांच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी भगवान बुद्धाने ३८ मंगल सांगितले. त्या मंगल सूत्रांच्या उपदेशाप्रमाणे आचरण केल्यास मनुष्याचे हित साधले जाईल असे प्रतिपादन भदंत के. संघरक्षित महाथेरो यांनी केले.महाविहार बावरीनगर दाभड येथे लाखो उपासकांच्या उपस्थितीत रविवारी धम्म परिषदेस प्रारंभ झाला आहे. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत भदंत के. संघरक्षित महाथेरो यांची उद््घाटनप्रसंगी धम्मदेसना झाली. ते म्हणाले, प्राचीन काळापासून भिक्खू संघाने धम्म जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. तेच कार्य वर्तमानकाळातील भिक्खू संघही करीत असल्याचे ते म्हणाले.डॉ. व्ही. के. भालेराव यांच्या 'संबोधी' या स्मरणिकेचे तसेच 'बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि बावरीनगरच्या ऐतिहासिक धम्मपरिषदा' या ग्रंथाचे प्रकाशन भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो, भिक्खूसंघ, डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तैवानच्या आर्याजी विशुद्धी, आर्याजी खेमा, भदंत अंगुलीमाल, शक्यपुत्र महाथेरो, भदंत प्रा. डॉ. एम. सत्यपाल, भंते प्रज्ञापाल, भंते बी धम्मसेन, भंते पय्याबोधी, सुभूती, भदंत धम्मसेवक महाथेरो यांचीही धम्मदेसना झाली. डॉ. भालेराव यांनी प्रास्ताविकात बावरीनगर धम्मपरिषदेचा इतिहास विशद केला.
मानवी कल्याणच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू-के.संघरक्षित
By admin | Updated: January 6, 2015 13:05 IST