परतूर : शहराबाहेरील साईबाबा मंदिराजवळील एका घरात चोरीत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ऐवज लंपास करण्यात आला. चोरीनंतर श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, उपयोग झाला नाही. परतूर शहराबाहेरील वाटूर परतूर रोडवरील राम अग्रवाल यांच्या घरात घुसून चोरट्यांनी हात साफ केला. रविवारी सकाळी ही घटना ही घटना उघडकीस आली. हे पूर्ण कुटूंब पुण्याला गेले असल्याने नेमके काय साहित्य चोरी झाले, हे समजू शकले नाही. ते परत आल्यानंतर त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ सुरक्षा वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. (वार्ताहर)पारध: भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या घटनेत दोन जणांनी आत्महत्या केल्या. यात एका विवाहित महिलेचा समावेश आहे.४वालसावंगी येथील प्रभू भास्कर बोडखे (२९) या तरूणाने १७ जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताला गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचा भाऊ अनिल बोडखे यांच्या माहितीवरून पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.४दुसऱ्या घटनेत जळगाव सपकाळ येथील विवाहिता नंदाबाई गजानन सपकाळ (३३) हिने १७ जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केल्याने तिला सिल्लोड येथील सामान्य रूग्णाल्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी ‘लोकमत’ला दिली.
परतूरमध्ये घर फोडले
By admin | Updated: January 19, 2015 00:55 IST