शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

नूतन नगराध्यक्षांपुढे आव्हानांचा डोंगर

By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST

सुनील घोडके खुलताबाद खुलताबाद नगर परिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची शुक्रवारी निवडणूक पार पडली.

सुनील घोडके खुलताबादखुलताबाद नगर परिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची शुक्रवारी निवडणूक पार पडली. शहर विकास आघाडीच्या सुषमा भावसार यांची नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. मात्र यापुढे त्यांना शहराच्या विकासासाठी विविध आव्हानांचा सामाना करावा लागणार आहे. नागरिकांच्या प्रश्नांबरोबरच कर्मचाऱ्यांचा प्रश्नही त्यांना सोडावा लागणार आहे.नगर परिषदेच्या नूतन अध्यक्षा भावसार यांना आगामी काळात खुलताबादकरांचा पाणी प्रश्न सतावणार आहे. सध्या खुलताबादकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून गिरजा मध्यम प्रकल्पात सद्य:स्थितीत महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने होत असले तरी अद्याप मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर नगर परिषदेत मोठ्या प्रमाणावर अधिकारी-कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्याचेही आव्हान स्वीकारावे लागणार आहे. खुलताबाद शहरात अतिक्रमण वाढले असून नगर परिषदेच्या जागेवर होणारे अतिक्रमण ही मोठी डोकेदुखी होणार आहे. नाले सफाई, विद्युत लाईट बसविणे आदी कामे करून घ्यावी लागणार आहेत. नगर परिषदेतील अनेक सफाई मजूर हे कामाच्या नावाने इकडे-तिकडे गप्पा मारत फिरत असतात. त्यांच्यावरही लक्ष द्यावे लागणार आहे. शहरातील लहानी आळी ते भद्रा मारुती, नगारखाना गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हे रस्ते अत्यंत खराब आहेत. या रस्त्यांवर पर्यटक व भाविकांची गर्दी असते, त्यामुळे येथे दुरुस्तीचे काम हाती घ्यावेच लागणार आहे. हीच अपेक्षा खुलताबादकरांना आहे. नगराध्यक्षपदी भावसार; उपनगराध्यक्षपदी पटेल खुलताबाद : नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आ. प्रशांत बंब यांच्या शहर विकास आघाडीच्या सुषमा संजय भावसार या १६ विरुद्ध १ मताने विजयी झाल्या, तर उपनगराध्यक्ष मकसूद पटेल हे बिनविरोध निवडून आले.आजच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रईसा इसाक कुरेशी या उमेदवार असतानाही रा.काँ., काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या आठ नगरसेवकांनी आ. प्रशांत बंब यांच्या शहर विकास आघाडीला खुलेआम पाठिंबा दिला.पीठासीन अधिकारी राजू नंदकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीच्या सुषमा संजय भावसार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रईस इसाक कुरेशी या रिंगणात होत्या. नगर परिषदेत शहर विकास आघाडीचे ८, काँग्रेस-४, राष्ट्रवादी काँग्रेस-४, शिवसेना-१ असे पक्षीय बलाबल असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुषमा भावसार यांनी १६ मते मिळवीत दणदणीत विजय मिळविला, तर राष्ट्रवादीच्या रईसा कुरेशी यांना स्वत:चेच मत मिळाले. उपनगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे मकसूद पटेल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. (वार्ताहर)