जालना : जालना शहरात इयत्ता बारावीत गुणवाढ करुन देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांना अटकही करण्यात आलेली आहे. मात्र या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याने परीक्षा मंडळाच्या अध्यक्षांसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ काकडे पाटील यांनी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांना निवेदनाद्वारे केली आहे.एकूणच या प्रकरणात परीक्षा मंडळाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, आणखी काही अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे. परीक्षा घेण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी ही परीक्षा मंडळाची असल्याने या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचारी दोषी असल्याची आमची धारणा आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी, यासाठी मंडळाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सक्रिय सदस्य जगन्नाथ काकडे पाटील, जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे, संतोष माने पाटील, तुकाराम सराफ, ऋषिकेश जैस्वाल, सतीश पवार, मच्ंिछद्र देवकर, बंडू शिंदे, नंदू म्हस्के, अक्षय खेडकर, इम्तियास रब्बानी, शुभम म्हस्के, अमोल मते, गणेश टेलोरे, निलेश गोरडे, संतोष चांदोडे, महेश सुरासे, विक्की गोरे, अमोल निकाळजे, ललित कुलकर्णी, बाळू कुबेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनाची प्रत पालकमंत्री रामदास कदम, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. चंद्रकांत खैरे आणि पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
गुणवाढप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
By admin | Updated: March 30, 2016 00:36 IST