शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मेरखेडा येथे आरोग्य पथकाकडून तपासणी

By admin | Updated: April 9, 2015 00:11 IST

केदारखेडा : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेरखेडा गावात डेंग्यू सदृश तापाच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे सविस्तर वृत प्रसिध्द केले़ हे वृत्त प्रसिध्द होताच या गावात आरोग्य पथक दाखल झाले़

केदारखेडा : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेरखेडा गावात डेंग्यू सदृश तापाच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे सविस्तर वृत लोकमतने दि़८ रोजी प्रसिध्द केले़ हे वृत्त प्रसिध्द होताच या गावात आरोग्य पथक दाखल झाले़ आरोग्य पथकाने केलेल्या सर्वेक्षणात गावात जवळपास २५ रुग्ण तापाने तर २० पेक्षा अधिक रुग्ण जालना, औरंगाबाद, भोकरदन ठिकाणी खासगी दवाखाण्यात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या गावात सांडपाणी, नाल्यांद्ववारे वाहून न जाता एकाच ठिकाणी तुंबत असल्याने आजार वाढत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. परंतु हा आजार आटोक्यात आण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचातच्या वतीने प्रत्येक घरासमोर शोषखडे तयार करुन देणार आहेत. सांडपाणी नाली सफाईचे काम तात्काळ हाती घेतले असल्याचे ग्रामसेवक एस़आऱपडोळ, सरपंच गोविंदराव बकाल यांनी सांगितले़तर गावात आलेल्या आरोग्य पथकाने घरोघरी भेटी दिल्या.साथरोग, किटकजन्य रोग, स्वच्छता व जनजागृती, जलजन्य व किटकजन्य आजाराबाबत माहिती देऊन पिण्याच्या पाण्यात औषधी टाकल्या. डेंग्यूसदृश रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. काही रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ एस़जी़लटपटे यांनी सांगितले. या पथकात आरोग्य सहाय्यक एस़एम़ आक्से, प्रयोगशाळा तत्रंज्ञ के़ आऱ सोनार, आरोग्य सहाय्यक पी़ ए.भोंगाडे, आरोग्य सेवक व्ही़ आऱ सहाणे, व्ही़ बी़ पाटसावणे, ए. एम़ ठोंबरे, व्ही़ डी़ सोनवणे, दांडगे आदींचा समावेश होता़ या गावातील डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण वाढतच असून, आरोग्य विभागाने विशेष पथकाद्वारे गावात तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे.