शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

हरभरा पिकावर घाटेअळीचे आक्रमण !

By admin | Updated: January 9, 2017 23:42 IST

कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत.

कळंब : तालुक्यात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाचा पेरा झालेला असून या हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी ही प्रमुख पिके वाढीच्या महत्वाच्या टप्यात आहेत. नादुरूस्त रोहित्राचे वाढलेले प्रमाण या पिकासमोरील मोठी समस्या ठरत आहे. पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने गावोगावी या सुलतानी संकटामुळे असंख्य शेतकरी हैैराण झाल्याचे दिसून येते. हे थोडके म्हणून की काय, हरभऱ्याच्या पिकावर सध्या मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.रबीतील गहु, ज्वारी, हरभरा यांचा वाढीचा टप्पा सुरू झाल्यानंतर कळंब तालुक्यातील ६० हजार हेक्टरवरील रबी हंगामातील पिकांना संरक्षित पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी गेल्या दिड महिन्यापासून शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. याशिवाय ऊस, टरबूज, मिरची आदी नगदी पिकांची लागवडही जोमात आहे. खरीपातील तूर व रबीतील हरभऱ्यावर अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. तालुक्यात हरभऱ्याचे क्षेत्र साडेतीन पट वाढले असून तब्बल ३२७२२ हेक्टरवर पेरा झालेल्या हरभऱ्याला घाटेअळीपासून वाचविताना शेतकऱ्यांची दमछाक होवूलागली आहे. तर वाढत्या थंडीमुळे १६ हजार ७०० हेक्टरवरील ज्वारीच्या पिकांवर हिव पडण्याचा धोका निर्मान झाला आहे.पांढऱ्या सोन्याकडून पुन्हा निराशातालुक्यातील कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास साडेचार हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. परंतु, याही वर्षी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची या पांढऱ्या सोन्याने निराशा केली आहे. सोयाबीनच्या एकरी घटत्या उत्पादनाच्या धक्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच अता कापसाचा एकरी उतारा निचांकी मिळाला. पावसाचा खंड, परत अतिवृष्टी यामुळे खुंटलेली वाढ, पातेगळ झाल्याने यंदाही कापसाची मजल एकरी दिड ते दोन क्विंटलपर्यंतच गेली. नफा तर सोडा कापसात अनेक शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली. (वार्ताहर)